Petrol Diesel Rate  Saam TV
देश विदेश

Petrol-Diesel Price: नव्या आर्थिक वर्षातच सरकारनं दिला महागाईचा दणका; पेट्रोल- डिझेल महाग होणार, दर कधीपासून वाढणार?

Petrol and diesel price hike in India: केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सरासरी २ रुपयांनी वाढणार आहेत.

Bhagyashree Kamble

एकिकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनेही गगनचुंबी केली आहे. केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर सरासरी २ रुपयांनी वाढ होणार आहेत. जागतीक तेलाच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतार आणि डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे दर मध्यरात्री १२ वाजता लागू होणार आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अधिसूचनेनुसार, हा बदल ८ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटलं की, आज उत्पादन शुल्क दरात वाढ करण्यात आल्यानंतर पीएसयू तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ होणार नाही, असे सांगितले आहे. यामुळे सामान्यांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ८७ रूपये प्रति लिटर आहे. या नव्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होणार आहे. आतापर्यंत हे सरकार पेट्रोलवर १९.९० रूपये तर, डिझेलवर १५.८० रूपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारात होते. पण आता ही वाढ झाल्यानं पेट्रोल शुल्क २१.० रूपये आणि डिझेलवरील शु्ल्क १७.८० रूपय प्रति लिटर होणार आहे.

पेट्रोल - डिझेलचे दर ठरवणारे ४ महत्त्वाचे घटक

कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत

भारतीय रूपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे मूल्य

केंद्र आणि राज्य सरकारांचे कर

देशातील इ्ंधणाची मागणी

पेट्रोल डिझेलचे दर कोण ठरवतं?

२०१० पूर्वी: सरकार दर १५ दिवसांनी निश्चिक करत असे.

२६ जून २०१० पासून: पेट्रोलचे दर ठरवण्याचे अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आले.

१९ ऑक्टोबर २०१४ पासून: डिझेलचे दर ठरवण्याचे अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आले.

सध्या दररोज सकाळी ६ वाजता दर अपडेट केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT