Petrol Pump India X
देश विदेश

Fuel Ban Alert : पेट्रोल पंपावर 'या' वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल, १० दिवसांनी निर्णय लागू होणार

Fuel Ban Alert in Marathi : दिल्लीकरांसाठी महत्वाची बातमी हाती आलीये. पेट्रोल पंपावर 'या' वाहनांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. तर १ जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. दिल्लीत १० वर्ष जुनं डिझेल वाहन आणि १५ वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांना १ जुलैपासून पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही. तर कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या (सीएक्यूएम) अनुसार, १ नोव्हेंबरपासून गुरुग्राम, फरीदाबाद, गाझियाबाद, गौतमबुद्ध नगर आणि सोनीपत या भागात १५ वर्ष जुन्या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही. त्याचबरोबर १ एप्रिल २०२६ नंतर एनसीआर आणि इतर भागात हा नवीन नियम लागू होणार आहे. कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटने याबाबत घोषणा केली आहे.

कमिशन ऑफ एअर क्वालिटी मॅनेजमेंटमधील सदस्य डॉ. वीरेंद्र शर्मा यांनी म्हटलं की, 'दिल्लीत ५०० पेट्रोल पंपावर एएनपीआर कॅमेरे लावण्यात येतील. यामुळे वाहनांच्या डेटाचा रियल टाइम ट्रेकिंग करणे शक्य होणार आहे. या सिस्टममधून ३.६३ कोटींहून अधिक वाहनांची तपासणी करणे शक्य आहे. त्यातील ४.९० लाख वाहनांची एंड-ऑफ-लाइफ अशी नोंद करण्यात आली आहे. तर २९.५२ लाख वाहनांचं पीयूसीसीचं नुतनीकरण झालं आहे. यासाठी १६८ कोटी रुपयांचं चालान जारी करण्यात आलं आहे.

दिल्ली वाहतूक विभागाकडून जुन्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पेट्रोल पंपावर विशेष पथके तैनात करण्यात आले आहेत. या पथकासाठी १०० जण काम करणार आहेत. दिल्ली आणि एनसीआरमधील हवेच्या शुद्धीकरणासाठी बीएस मानके वाहने हटवणे जरुरी आहे. जुन्या वाहनामुळे वायू प्रदूषणात मोठी भर पडते. त्यामुळे निर्णय घेण्यात आला. या सिस्टमचा टोल नाक्यावरही वापर केला जाणार आहे. यासाठी १०० जण काम करणार आहेत.

एएनपीआर सिस्टनुसार वाहन पेट्रोल पंपावर प्रवेश करताच त्यांची नोंद केली जाईल. सिस्टम वाहनावरील क्रमांकाची पडताळणी करेल. यात रजिस्ट्रेशन डिटेल, फ्यूल टाइप आणि वाहन या माहितीचा समावेश आहे. एखादं वाहन १५ वर्षांहून अधिक जुनं असेल, तर पेट्रोल पंपावर इंधन न देण्याविषयी अलर्ट मिळेल. या वाहनधारकांनी नियमांचं उल्लंघन केल्यास वाहन जप्त केले जाईल. तसेच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT