Vishal Gangurde
पावसामुळे अनेकांच्या घरात माशा भिरभिरतात. या माश्यांमुळे आरोग्याला अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
पावसाळ्यातील माश्यांमुळे अनेक रोग पसरू शकतात. त्यामुळे माश्यांच्या समस्येपासून मुक्त होणे गरजेचे ठरते.
कापूरचा वापर केल्याने तुमची माश्यांपासून सुटका होऊ शकते. यासाठी घरात १०-१२ कापूर वड्या घ्या. त्यांची बारीक पावडर बनवा. त्यानंतर एक लिटर पाण्यात मिसळवून द्रावण तयार करून स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर घरात फवारणी करा.
घरातील माशा दूर करण्यासाठी पाने फायदेशीर ठरतात. तुळशीचे काही पाने घेऊन बारीक वाटून पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट पाण्यात मिसळा. पेस्ट मिश्रित पाणी स्प्रे बाटलीत भरा. त्यानंतर घरात दोनदा फवारणी करा.
दालचिनीची बारीक पावडर मदतगार ठरेल. यासाठी दालचिनीची बारीक पावडर घरात वेगवेगळ्या ठिकाणी शिंपडा.
पाण्यात मीठ विरघळवून ते घरात फवारावे. तसेच तुम्ही मिठाच्या पाण्याने घर पुसू शकता.
चार ते पाच चमचे लाल तिखट पाण्यात मिसळवून द्रावण तयार करा. त्यानंतर स्प्रे बाटलीच्या मदतीने घरात फवारणी करा. हा उपाय करताना तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या. तसेच मुलांनाही दूर ठेवा.