दर महिन्याला काही ना काही बदल होत असतात. आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरु झाली असून या महिन्यात क्रेडिट कार्ड, सिलेंडर, ट्रेन तिकीट तसंच FD डेडलाइन यांसारख्या नियमांमध्ये बदल झाला आहे. यंदाच्या महिन्यात कोणते नियम बदलणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती बदलतात. यंदाही नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. या बदललेल्या नियमांनुसार, 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत बोलायचे झालं तर जुलै महिन्यात १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली होती, मात्र त्यानंतर सलग तीन महिन्यांपासून त्यात वाढ होताना दिसतेय.
दर महिन्याला सीएनजी पीएनजी, एअर टर्बाइन इंधन (सुधारणा) मध्ये देखील बदल करण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून हवाई इंधनाच्या किमतीत कपात झाली असून या वेळीही सणासुदीची भेट ही दर कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. याशिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सब्सिडियरी SBI कार्ड 1 नोव्हेंबरपासून मोठे बदल लागू करणार आहे. हा बदल त्ंयाच्या क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंट आणि फायनान्स चार्जेसशी संबंधित आहेत. 1 नोव्हेंबरपासून, असुरक्षित SBI क्रेडिट कार्डवर दरमहा 3.75 रुपये फायनान्स चार्जेस भरावे लागणार आहे. याशिवाय, वीज, पाणी, एलपीजी गॅस आणि इतर उपयुक्तता सेवांसाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरल्यास 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारलं जाऊ शकतं.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डोमेस्टिक मनी ट्रान्सफर (DMT) साठी नवीन नियम जाहीर केलेत. हे नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहेत. या नियमांचा उद्देश फसवणुकीसाठी बँकिंग चॅनेलचा गैरवापर रोखणं हा असणार आहे.
भारतीय रेल्वेचा रेल्वे तिकीट आगाऊ आरक्षण कालावधी (ARP), ज्यामध्ये प्रवासाच्या दिवसाचा समाविष्ट नाही तो 1 नोव्हेंबर 2024 पासून 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केला जाणार आहे. तिकीट खरेदी प्रक्रिया सुव्यवस्थित करून प्रवाशांची सोय राखण्यासाठी हा नियम बदलण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.