108th Episode of Mann Ki Baat Saam Tv
देश विदेश

Mann Ki Baat: चांद्रयान-3 ते अयोध्या राम मंदिरापर्यंत, वर्षाच्या शेवटच्या मन की बातमध्ये PM मोदी काय म्हणाले?

108th Episode of Mann Ki Baat: नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाच्या शेवटच्या 'मन की बात' भागात देशाला संबोधित केले. आज 108 व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी 2023 मधील भारताच्या यशांबद्दल बोलले.

Satish Kengar

108th Episode of Mann Ki Baat:

नवीन वर्षात प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाच्या शेवटच्या 'मन की बात' भागात देशाला संबोधित केले. आज 108 व्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी 2023 मधील भारताच्या यशांबद्दल बोलले. चांद्रयान-3 आणि अयोध्या राम मंदिरा बद्दलही ते बोले. 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना रामभजन नावाचा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचे आवाहन केले. ज्यात कविता आणि इतर रचनांचा समावेश आहे. जेणेकरून मंदिराचे उद्घाटन ऐतिहासिक होऊ शकेल. पंतप्रधान मोदींनी फिट इंडिया मुव्हमेंटचा नाराही दिला.

देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ''आपल्या देशाने यावर्षी अनेक विशेष कामगिरी पार पाडल्या आहेत, ही या 140 कोटी लोकांची ताकदच आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा ‘नारी शक्ती वंदन कायदा’ यावर्षी मंजूर झाला. भारत सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेकांनी पत्र लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मला G20 परिषदेच्या यशाची देखील आठवण करून दिली आहे.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''आज भारतातील प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे, विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने भारावलेला आहे. वर्ष 2024 मध्ये देखील आपल्याला हीच भावना आणि चालना कायम ठेवायची आहे. प्रत्येक भारतीय हा ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राला महत्व देत आहे हे दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केले आहे. आजही मला अनेक लोकं चांद्रयान 3 च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत. मला विश्वास आहे की माझ्याप्रमाणेच तुम्हांला देखील आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेषतः महिला शास्त्रज्ञांचा विशेष अभिमान वाटत असेल. '' (Latest Marathi News)

आरआरआर चित्रपटाबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ''जेव्हा नाटु-नाटु ला ऑस्कर मिळाला, तेव्हा संपूर्ण देश आनंदाने नाचत होता. 'द एलिफंट व्हिस्परर्स' ला मिळालेल्या सन्मानाबद्दल ऐकून कोणाला बंर आनंद झाला नाही? यासगळ्यातून जगाने भारताची सर्जनशीलता पाहिली आणि पर्यावरणा बाबत असणारा आपला जिव्हाळा समजून घेतला. या वर्षी आमच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. आशियाई खेळांमध्ये आमच्या खेळाडूंनी 107 पदके आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये 111 पदके जिंकली. क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. अंडर-19 T-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या महिला क्रिकेट संघाचा विजय खूपच प्रेरणादायी आहे. अनेक खेळांमधील खेळाडूंच्या कामगिरीने देशाचे नाव उंचावलं आहे. आणि आता 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.''

ते म्हणाले, ''आज शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत खूप चर्चा होत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. मुंबईतील “Infi-heal” आणि “YourDost” सारखे स्टार्टअप्स मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करत आहेत हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. एवढेच नाही तर आज यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,'' मी येथे फक्त काहीच स्टार्टअप्सची नावे घेऊ शकतो, कारण यादी खूप मोठी आहे. फिट इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सबद्दल मला कळवत राहा, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी बोलणार्‍या सुप्रसिद्ध लोकांचे अनुभवही मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT