Emmanuel Macron  ANI File
देश विदेश

Republic Day 2024: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष असणार प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

Republic Day Chief Guest: प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. इम्यॅन्यूएल मॅक्रॉन यांनी भारताचे आमंत्रण स्वीकारलं असून त्यांनी एक्सवर पोस्ट करत मी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास येईल असं म्हटलंय.

Bharat Jadhav

Emmanuel Macron Republic Day Chief Guest:

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार हे ठरलं आहे. फ्रान्सचे पंतप्रधान यावेळी प्रमुख पाहुणे असणार आहेत. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील. (Latest News)

या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे मॅक्रॉन हे फ्रान्सचे सहावे नेते असतील. याआधी माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी १९७६ आणि १९९८ असे दोनवेळा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास हजेरी लावली होती. भारताकडून देण्यात आलेल्या निमंत्रण त्यांनी स्वीकारलंय. भारताने दिलेलं आमंत्रण स्वीकारल्याची माहिती त्यांनी एक्सवर पोस्ट करत दिलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताकडून आमंत्रण मिळाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. एक्स पोस्ट करताना ते म्हणाले, "तुमच्या आमंत्रणासाठी धन्यवाद, माझे प्रिय मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या प्रजासत्ताक दिनी मी तुमच्यासोबत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तिथे असेन!" केंद्र सरकारने याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना निमंत्रण पाठविले होते. मात्र जानेवारी महिन्यात दिल्लीला येऊ शकत नाही, असे त्यांनी कळविले होते. या पार्श्वभूमीवर सरकारकडून मॅक्रॉन यांना निमंत्रण पाठविण्यात आलं असून भारताने दिलेल्या आमंत्रण मॅक्रॉन यांनी स्वीकारलंय.

दरम्यान मागच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी उपस्थिती दर्शविली होती. तर गेल्या वर्षांपासून भारत आणि फ्रान्समधील संबंधांमध्ये सुधारणा झालीय. यावर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात बॅस्टिल डे परेडमध्ये प्रमुख पाहुणे उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

SCROLL FOR NEXT