Prime Minister Resigns in France :  Saam tv
देश विदेश

Prime Minister Resigns : पंतप्रधानांचा अवघ्या एका महिन्यात राजीनामा; या देशात PM च्या खुर्चीवर कुणीच का टीकत नाही? कारणे काय?

Prime Minister Resigns in France : फ्रान्सच्या पंतप्रधानांनी अवघ्या एका महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या राजीनामन्यामुळे फ्रान्समधील राजकारण ढवळून निघालं आहे.

Vishal Gangurde

फ्रान्सचे पंतप्रधान सेबॅस्टियन लेकोर्नू यांचा एका महिन्यातच पंतप्रधानपदाचा राजीनामा

लेकोर्नू यांच्याकडे फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाचा कारभार होता

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी त्यांच्या राजीनामा स्वीकारला

या घटनेमुळे फ्रान्समधील राजकीय वातावरणात प्रचंड उलथापालथ

France PM Resigns: फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकॉर्नू यांनी अवघ्या एका महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लेकोर्नू यांच्याकडे फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाचा कारभार होता. राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी त्यांना पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. मात्र, सेबेस्टियन यांनी अवघ्या एका महिन्यातच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळे फ्रान्समधील राजकारण ढवळून निघालं आहे.

फ्रान्समध्ये गेल्या काही महिनाभरापासून राजकारणातील मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांच्या अध्यक्षेतेखाली रात्री उशिरा बैठक झाली. त्यांनी मंत्रिमंडळात बदल केला नाही. तर थेट नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. त्यामुळे सेबेस्टियन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

सेबेस्टियन यांनी अवघ्या एका महिन्यात राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळणारे नेते ठरले आहेत. सार्वजनिक कर्जाचा वाढत्या ओझ्यामुळे पंतप्रधान सेबेस्टियन यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे.

फ्रान्स सरकारचा गाडा हाकणाऱ्या यंदाच्या सत्ताधाऱ्यांनी इतिहासातील सर्वाधिक कर्ज घेतलं आहे. यंदाच्या सत्ताधाऱ्यांनी फ्रान्सच्या राजकीय इतिहासातील सर्वात जास्त कर्ज ठरलं आहे. त्यामुळे यंदाच्या सत्ताधाऱ्यांना देशाचा कारभार हाकण्यासाठी देखील कर्ज घ्यावे लागत आहे. या कर्जाने उच्चांकी गाठली आहे. यूरोपियन यूनियनमधील ग्रीस आणि इटलीनंतर फ्रान्स सर्वाधिक कर्जबाजारी देश ठरला आहे.

राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी देशाची स्थिती मजबूत करण्यासाठी मागच्या वर्षीच्या मध्यात अचानक संसदीय निवडणुकीची घोषणा केली होती. निवडणुका झाल्यानंतरही फ्रान्स राजकीय गर्तेत अडकला आहे. त्यामुळे मॅक्रो यांचा डाव उलटल्याचं बोललं जात आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्या गटाचे विधानसभेत अल्पमत झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT