Francis Scott Bridge 
देश विदेश

Francis Scott Bridge: फ्रांसिस स्कॉट पुलाला ९४८ फूट लांबीच्या जहाजाची धडक; ३ KM लांबीचा पूल नदीत कोसळला Video Viral

Francis Scott Bridge : मेरीलँडमधील पेटाप्सको नदीवर १९७७ मध्ये फ्रांसिस स्कॉट पूल उभारण्यात आला होता. या पुलाचं नाव अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणारे फ्रांसिस स्कॉट यांच्या नावावर ठेवण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cargo Ship Collision To Francis Scott Bridge :

अमेरिकेच्या मेरीलँडमधील पेटाप्सको नदीवर असलेल्या 'फ्रांसिस स्कॉट' पुलाला एक कार्गा जहाज धडकल्याची घटना घडलीय. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री दीड वाजता ही दुर्घटना घडली. पुलाला जहाज धडकल्यानंतर त्याला आग लागलीय. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (Latest News)

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मेरीलँड ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटीने सांगितलं की, दुर्घटनेनंतर वाहतूक बंद करण्यात आलीय. फ्रांसिस स्कॉट पुलाला धडकणारे जहाज ९४८ फूट लांबीचं होतं. पेटाप्सको नदीवर १९७७ मध्ये फ्रांसिस स्कॉट पूल उभारण्यात आला होता. या पुलाचं नाव अमेरिकेचे राष्ट्रगीत लिहिणारे फ्रांसिस स्कॉट यांच्या नावावर ठेवण्यात आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान अपघातग्रस्त जहाजावर सिंगापूरचे ध्वज लावण्यात आले होते. हे जहाज श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होतं. या जहाजाचं नाव दालो असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान पूल नदीत कोसळल्याने अनेकजण पाण्यात बुडाले असून त्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. पंरतु या पुलावर किती जण होते याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये.

दाली जहाजावरील दोन्ही कप्तान आणि संपूर्ण क्रू सुरक्षित असल्याची माहिती जहाजाच्या मालकी कंपनीने दिलीय. या कार्गा जहाजाची पुलाला धडक कशामुळे झाली याचे कारण अजून समोर आले नाहीये. या अपघाताचा तपास जहाजाचे मालकाकडून केला जात आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार , बाल्टिमोर हार्बरमध्ये पाण्याचं तापमान ९ डिग्री सेल्सिअस आहे. अमेरिका सेंटर फॉर डीसीज कंट्रोलननुसार, २१ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्याने मानवी शरीरातील तापमान सुद्धा कमी होत असते. यामुळे पाण्यात बुडालेल्या लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.

मागील वर्षी बाल्टिमोर बंदरावरून ६.६७ लाख कोटी रुपयांच्या वस्तूंची वाहतूक केली जाते. मैरीलँड सरकारची वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी बाल्टिमोर पोर्ट पासून जवळपास ५.२ कोटी टनच्या इंटरनॅशनल कार्गोची वाहतूक झाली होती. त्याची किंमत ६.६७ लाख कोटी रुपये होती. या पोर्टच्या माध्यमातून १५ हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंडेंच्या तिसऱ्या लेकीची राजकारणात एन्ट्री, यशश्री मुंडे राजकारणाच्या मैदानात,यशश्री लढवणार वैद्यनाथ बँकेची निवडणुक

Maharashtra Politics: राऊतां विरोधात शिरसाटांनी ठोकला शड्डू,'बदनामीसाठी मॉर्फ व्हिडीओ', शिरसाटांचा दावा,'पैशांच्या बॅगेचे आणखी व्हिड़िओ बाहेर काढू

Maharashtra Politics: शिलेदारांनी वाढवल्या शिंदेंच्या अडचणी?आपल्याच नेत्यांमुळे शिंदे चक्रव्युहात? खोतकर, शिरसाटांसह गायकवाडही अडचणीत

Maharashtra Live News Update : पुण्यातील यशवंत नाट्यगृहात वंचित बहुजन आघाडीचा राडा

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT