अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे एका २४ वर्षीय भारतीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. अर्शिया जोशी असे मृत तरुणीचे नाव आहे. गेल्या वर्षी त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केलं होतं. जोशी यांचे कुटुंबीय आणि स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती भारतीय वाणिज्य दूतावासाने दिली. मृत तरुणीचं पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असं दूतावााने म्हटलं आहे.
जोशी यांचे पार्थिव दिल्लीत त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवण्यासाठी एनजीओची टीम मदत करत आहे. टीम एड परदेशात प्रवास करत असलेल्या किंवा परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायातील लोकांना मदत करते. अपघात, आत्महत्या, खून किंवा प्रियजनांचा आकस्मिक मृत्यू यासारख्या गंभीर परिस्थितींचा सामना करणाऱ्या लोकांना ही संस्था आधार देते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
न्यू मेक्सिकोमधील अपघातात जीव गमावलेल्या दोन ट्रक चालकांचे मृतदेह देखील भारतात पाठवण्यासाठी मदत करण्यात आली होती. न्यू मेक्सिकोमध्ये एका तरुण ट्रक चालकाचा अचानक मृत्यू झाला आणि त्याचे अवशेष अमृतसरला पाठवले जात आहेत. सिएटल, वॉशिंग्टन येथे एक 25 वर्षीय भारतीय विद्यार्थी त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला आणि त्याचे अवशेष बेंगळुरूला नेले जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.