uttar pradesh crime  Saam tv
देश विदेश

खळबळजनक! दिवसाढवळ्या एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Uttar pradesh crime news : दिवसाढवळ्या एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Vishal Gangurde

उत्तर प्रदेशमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

चौघांच्या हत्येने गावात खळबळ

स्थानिकांकडून कठोर कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात सोमवारी दुपारी खळबळजनक घटना घडली आहे. नगर कोतवाली क्षेत्राली नगला प्रेमी गावात दिवसाढवळ्या एकाच कुटुंबातील ज्येष्ठ सासू-सासरे, सून आणि नातवाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. चौघांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. चौघांच्या हत्येने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील चौघांची हत्या केल्यानंतर मृतदेहांचं शीर जड वस्तूने ठेचलं आहे. दोन मजली घरातील एका खोलीत बेडवर एक मृतदेह आढळला. तर दोन मृतदेह जमिनीवर पाहायला मिळाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. गावातील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने गावकरी भयभीत झाले आहेत. चौघांच्या मृत्यूनंतर गावातील मंडळीनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. गावातील मंडळींनी हत्या करणाऱ्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नगला प्रेमी गावात गंगा सिंह यांचं कुटुंब राहत होतं. घरात गंग सिंह यांच्या व्यतिरिक्त त्यांची पत्नी, सून, नातू आणि नात देखील राहायचे. त्यांचा मुलगा नोकरी करतो. गंगा सिंह हे दुकानावरून दुपारी घरी आले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने घरात घुसून गंगा सिंह, त्याची पत्नी श्यामा देवी,सून रत्ना, नात ज्योतीवर हल्ला केला होता. हल्लेखोराच्या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले.

हल्लेखोर चौघांवर हल्ला करून घटनास्थळावरून फरार झाला. तर नातू शाळेतून घरी आल्यानंतर दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यावर कुटुंबातील सदस्य रक्ताच्या थारोळ्यात आढळले. कुटुंबातील सदस्यांना पाहून त्याने एकच आरडाओरड केली. त्यानंतर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याच्या घरी पोहोचले. घरातील तिघांचा मृत्यू झालेला होता. तर शेजाऱ्यांनी श्यामा देवी गंभीर जखमी झाल्या होता. त्यांना रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navneet Rana: 'बाबा सिद्दिकीसारखी तुझी हत्या करू', भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी

Maharashtra Live News Update: आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला झटका, राष्ट्रवादीचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत

Love Letter : महिने गेले वर्ष लोटले, पण आठवण काही जाईना, प्रेमाची ट्रेन पुन्हा येईना

Crime: इथे रोज आली तर ५००० रुपये देईन, जबरदस्ती ऑफिसमध्ये नेलं अन्...; सरपंचाच्या नवऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य

Hair Care Tips: कोंडा आणि केसांचा कोरडेपणा होईल कमी, फक्त केसांना लावा १ चमचा तूप

SCROLL FOR NEXT