Former MLA Vijay Mishra and his family sentenced by Bhadohi court in illegal property grab case, triggering political shockwaves. saam tv
देश विदेश

माजी आमदारासह संपूर्ण कुटुंबाला 10 वर्षांचा तुरुंगवास; राजकीय वर्तुळात खळबळ

Vijay Mishra Property Grab Case Full Details: उत्तरप्रदेशातील माजी आमदार विजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबाला भदोही न्यायालयाने मालमत्ता बेकायदेशीरपणे हडपल्याप्रकरणी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेशमधील भदोही येथील न्यायालयाने माजी आमदार विजय मिश्रा, त्यांच्या पत्नी रामली मिश्रा आणि मुलगा विष्णू मिश्रा यांना नातेवाईकाची मालमत्ता बेकायदेशीरपणे बळकवल्याप्रकरणी प्रत्येकी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांची सून रूपा मिश्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दोन दिवसांपूर्वी, प्रयागराज येथील न्यायालयाने विजय मिश्रा यांना एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

भदोहीचे माजी आमदार विजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. भदोहीच्या न्यायालयाने भावकीची मालमत्ता बेकायदेशीरपणे हडपल्याने विजय मिश्रा, त्यांच्या पत्नी रामली मिश्रा आणि मुलगा विष्णू मिश्रा यांना प्रत्येकी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची सून रूपा मिश्रा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या न्यायालयीन निर्णयामुळे विजय मिश्रा आणि त्यांचे कुटुंबीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

या प्रकरणात फसवणूक आणि मालमत्तेचा अवैध ताबा घेतल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची सुनावणी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. पक्षकारांनी अनेक कागदपत्रे आणि साक्षीदार सादर केले, ज्यांच्या आधारे न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले. निकालाच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. विजय मिश्रा यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच, प्रयागराज येथील न्यायालयाने त्यांना एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आता, दुसऱ्या एका प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या एकापाठोपाठ झालेल्या दोन शिक्षांमुळे विजय मिश्रा यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिमेवर मोठा परिणाम झाला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विजय मिश्रा यांची पूर्वांचलच्या राजकारणातील एक प्रभावशाली नेते म्हणून ओळख

भदोही जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, अलिकडच्या वर्षांत त्यांच्यावर खंडणी, अतिक्रमण, हल्ला आणि खून यांसारख्या गंभीर आरोपांसह अनेक गुन्हेगारी खटले दाखल झाले आहेत. तपास यंत्रणा आणि पोलिसांनी अनेक प्रकरणांमध्ये आधीच कारवाई केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. असे बोलले जात आहे की, या सर्व शिक्षांमुळे येत्या काळात विजय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Palghar : पालघरमधील ऐतिहासिक आकर्षण, सागरी सुरक्षेचा रक्षक म्हणून ओळखला जायचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: महावितरणाच्या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक

LIC Child Investment : दिवसाला १५० रुपये जमा करून मिळवा १९ लाख... LICची जबरदस्त योजना; वाचा संपूर्ण गणित

कपाटावर या 5 वस्तू ठेवू नका, घरात वाढेल नकारात्मक उर्जा

Shocking: २ हजार रुपयांच्या भाड्यासाठी मालकाकडे सोपवली बायको अन् पोरगी; दोघींवर घर मालकाकडून वारंवार अत्याचार

SCROLL FOR NEXT