Devisingh Shekhawat - Prathibhatai Patil
Devisingh Shekhawat - Prathibhatai Patil Saam TV
देश विदेश

Devisingh Shekhawat Passed Away: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

साम टिव्ही ब्युरो

Devisingh Shekhawat News: अमरावती येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी आमदार देवीसिंह शेखावत यांचं पुण्यात निधन झालं आहे. सकाळी 9:30 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवीसिंग शेखावत भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती होते.

देवीसिंग शेखावत गेल्या दोन दिवसांपासून आजरी होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे पुण्यात केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावत चालली होती. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आज (शुक्रवारी) सायंकाळी 6 वाजता पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेखावत यांनी राजकारणातही आपले पाय रोवले होते. त्यांनी काही काळ आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत देवीसिंह शेखावत यांचा विवाह झाला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. तसेच अमरावती शहराचे ते पहिले महापौर होते.

साल 1995च्या विधानसभा निवडणुकीत देवीसिंह शेखावत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं होतं. सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्थेचे कामकाज देखील शेखावत पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

Gurucharn Singh Return Home : अखेर 'तारक मेहता...'फेम अभिनेता २५ दिवसांनी घरी परतला, गुरूचरण सिंह इतक्या दिवस कुठे होता?

Heat Wave Alert : दिल्लीकरांवर सूर्य कोपला, १४ वर्षांचा तापमानाचा रेकॉर्ड तुटला; ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

SCROLL FOR NEXT