Maharashtra Politics : जयंत पाटलांचा गौप्यस्फोट मग स्पष्टीकरण; पहाटेचा शपथविधी, राष्ट्रपती राजवट अन् पवारांची खेळी...

या सर्व घटनेवर आत जयंत पाटलांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV

Maharashtra Politics : विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेला शपतविधी सोहळा आजही चर्चेचा विषय आहे. दोघांनी देखील पहाटेचं राज्यपालांकडे हजेरी लावली होती. या शपतविधीने पुढे बराच काळ राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरू होता. या सर्व घटनेवर आत जयंत पाटलांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. (Latest Jyant Patil News)

पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हा शपथविधी पवारांची एक खेळू असू शकते असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. तसेच सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

"राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुशंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचे आमदार सोडून गेले आहेत. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही. ", असं वक्तव्य जयंत पाटील यांनी काल केलं होतं.

Maharashtra Politics
Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी मुळीच इच्छा नाही; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

जयंत पाटील सांगलीमध्ये आहेत. पवारांवर केलेल्या या वक्तव्यावर आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, " मी त्यावेळी सांगितलं की, कदाचित त्यावेळी परिस्थिती अशी होती की राष्ट्रपती राजवट होती आणि त्यामुळे ती उठण्यास त्या सगळ्याची मदती झाली ती आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे ते कसं झालं काय झालं मला माहित नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

Maharashtra Politics
Jayant Patil : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यांवरून जयंत पाटलांची शिंदे सरकारवर टीका; म्हणाले,एकही मायचा लाल...

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, " मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. योग्य वेळी शिवसेना आणि आंबेडकर यांची चर्चा चालू आहे. त्यांनी एकत्रित असं यायचं असं ठरलेलं आहे. तिन्ही पक्ष जेवढे जास्त मित्र जमवेल तेवढ्या मित्रांना या महाविकास आघाडीत घ्यायचं. उद्या राष्ट्रवादीने आणखीन कोणी मित्र गोळा केले तर त्यांनाही त्यात महाविकास आघाडी घेऊन महाविकास आघाडीची ताकद वाढवणार हा त्यातला आमचा हेतू आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही वेगळी भूमिका जर घेतली तर त्यांने मतदारांचा गोंधळ होतो आणि तसं होणार नाही याची दक्षता आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. "

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com