Imran Khan death claim Pakistani journalist : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांचा जेलमध्ये मृत्यू झाल आहे. असा दावा एका पाकिस्तानी पत्रकाराने केल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड खळबळ उडाली आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद असलेल्या इम्रान खान यांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (Imran Khan death claim Pakistani journalist PTI 2 million supporters ready to protest over jailed former PM access)
PTI ने इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. आपल्या नेत्याच्या सुरक्षेबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्या आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी पक्षाने सुमारे २० लाख समर्थकांसह इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या दिशेने 'लाँग मार्च' काढण्याची पूर्ण तयारी केल्याचेही वृत्त आहे.
पत्रकाराच्या दाव्याने उठले वादळ
पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर दावा केला की, लष्करातील तीन वरिष्ठ सूत्रांनी इम्रान खान आता जिवंत नसल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण या सूत्रांनी स्वतः इम्रान खान यांना पाहिलेले नाही किंवा या दाव्याला कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तरीही, या दाव्यामुळे आधीच तुरुंगात असलेल्या पूर्व पंतप्रधानांच्या स्थितीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
कुटुंब आणि वकिलांना भेटीस बंदी
इम्रान खान हे ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असून विविध प्रकरणांत शिक्षा भोगत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे कुटुंब, वकील, पक्षाचे नेते आणि वैयक्तिक डॉक्टर यांना त्यांची भेट घेण्यास प्रशासनाकडून सतत रोखले जात आहे. त्यांना एकांतवासात ठेवल्याने आणि योग्य वैद्यकीय तपासणी न मिळाल्याने समर्थकांमधील चिंता अधिक वाढली आहे.
PTI ची आक्रमक भूमिका व 'लॉन्ग मार्च'ची घोषणा
या अफवा पसरल्यानंतर पीटीआयच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी दावा केला आहे की, पक्षाचे २० लाखांहून अधिक समर्थक रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.