Shoaib Bobby shot dead Shoaib Bobby news
देश विदेश

माजी खासदाराच्या शूटरची १५ गोळ्या झाडून हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

Shoaib Bobby shot dead : माजी खासदाराच्या शूटरची १५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीये. हत्येच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

माजी खासदार मुख्तार अन्सारी याचा शूटर शोएब बॉबीची हत्या

बाराबंकीत बॉबीची १५ गोळ्या झाडून हत्या

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

माजी खासदार मुख्तार अन्सारीचा शूटर शोएब बॉबीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शोएब बॉबी लखनऊ जेलर हत्याकांडातील आरोपी होता. त्याला बाराबंकीच्या असैनीमध्ये गोळ्या संपवण्यात आलं आहे. शोएब बॉबीची १५ गोळ्या झाडून हत्या झाल्याचे उघड झालं आहे.

माजी खासदार मुख्तार अन्सारी याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल केले होते. अन्सारीविरोधात हत्या, अपहरण आणि खंडणीसारखे गुन्हे दाखल होते. मुख्तार अन्सारीला २००५ साली कृष्णानंद राय हत्या प्रकरणात तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. अन्सारीचा २८ मार्च २०२४ रोजी बांदा जेलमध्ये मृत्यू झाला. त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.

मुख्तार अन्सारीच्या गटात शूटर शोएब उर्फ बॉबी हा काम करत होता. शोएबवर अनेक गुन्हे दाखल होते. बारांबकी जिल्ह्यात बॉबीवर हल्ला करण्यासाठी दुचाकीवरून काही जण आले. त्यानंतर या हल्लेखारांनी बॉबीवर जवळून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या बॉबीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. बॉबीवर हल्ला करून हल्लेखोर फरार झाले.

शोएबची हत्या करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीचा तपास करत आहे. शोएब बॉबीचं नाव जेलर हत्याकांडात आलं होतं. या व्यतिरिक्त बॉबीवर हत्या, खंडणीशी संबंधित गुन्हे दाखल होते. त्याचं काही गँगशी नाव जोडले गेलं होतं. त्यामुळे गँगवॉरमुळे हत्या झाली का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस सर्व बाजूने तपास करण्यात येणार आहे. मुख्तार अन्सारीनंतर बॉबी देखील विरोधी गँगच्या निशाण्यावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या पत्रकारपरिषदेला सुरुवात

६ खासदार शिंदेंसेनेत जाणार? समजताच उद्धव ठाकरेंनी उचलले मोठं पाऊल, दिल्लीत टाकला डाव, थेट 'हा' कायदा वापरणार

Pune : पुण्यात धक्कादायक घटना! शेतातलं काम सांगितलं म्हणून नातू संतापला; रागारागात आजोबाची केली हत्या

Lionel Messi: वर्ल्डकपमध्ये पहिला गोल करताच मेस्सीला अश्रू अनावर, सामन्यानंतर स्वतःच सांगितलं कारण

Bollywood Singer Video : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गंभीर आजाराशी देतोय झुंज; MRI-CT स्कॅनही केलं, नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT