MP Accident News  Saam Tv
देश विदेश

Accident News : काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

Manvendra Singh Accident : मानवेंद्र सिंह आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून जयपूरला जात होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीवर आदळली. अलवरमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला.

प्रविण वाकचौरे

Accident News :

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे पुत्र आणि बाडमेरचे माजी काँग्रेस खासदार मानवेंद्र सिंह यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, माजी खासदार आणि त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवेंद्र सिंह आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून जयपूरला जात होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीवर आदळली. अलवरमध्ये दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून माजी खासदार व मुलगा जखमी झाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मानवेंद्र यांच्या छातीची बरगडी तुटली आहे. तर त्यांचा मुलगा हमीर याच्या हाताला व नाकाला फ्रॅक्चर झाले. तर कार चालकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. जखमींना उपचारासाठी अलवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (latest News)

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग खूप जास्त असल्याने कार अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजक ओलांडून भिंतीवर आदळली. अपघाता इतका भीषणा होता की कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

माजी खासदार मानवेंद्र सिंग यांचे वडील जसवंत सिंग हे भाजपचे वरिष्ठ नेते होते. जसवंत सिंग हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्रीही होते. त्याचवेळी मानवेंद्र सिंह हे एकेकाळी बारमेरचे खासदार होते, त्यांच्या पत्नी चित्रा सिंह याही राजकारणात सक्रिय होत्या. दोघांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ट्विटरवर मानवेंद्र सिंह यांच्या कारला झालेल्या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील चित्रा सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT