Champai Soren meets Amit Shah Saam Tv
देश विदेश

Champai Soren: चंपाई सोरेन यांनी गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट, 30 ऑगस्टला भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश

Saam Tv

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचेही स्पष्ट झाले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. हिमंता बिस्वा सरमा यांनी X वर एक पोस्ट करत हे देखील सांगितलं आहे की, चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी सांगितले की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांची येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हिमंता बिस्वा सरमा यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चंपाई सोरेन यांच्या भेटीचा फोटो देखील पोस्ट केला आहे. हिमंता बिस्वा सरमा हे झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी आहेत. तेही या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी झाले होते.

दरम्यान, चंपाई सोरेन यांनी म्हटले होते की, मुख्यमंत्री या नात्याने त्यांना प्रचंड अपमान सहन करावा लागला. या कारणास्तव त्यांना वेगळा मार्ग निवडण्यास भाग पाडले जात आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातील त्यांचे सर्व सरकारी कार्यक्रम पक्षनेतृत्वाने त्यांच्या सूचनेशिवाय अचानक रद्द केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मी कारण विचारले असता मला सांगण्यात आले की, 3 जुलैला पक्षाच्या आमदारांची बैठक आहे. तोपर्यंत मी कोणत्याही सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, असं ते म्हणाले होते.

यानंतर चंपाई सोरेन यांनी लवकरच पुढची राजकीय वाटचाल ठरवणार असल्याचे जाहीर केले होते. चंपाई सोरेन यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. यानंतर आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT