Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope in Marathi : आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. तुमचा दिवस मनोरंज आणि आनंदात जाईल. वाचा तुमचं संपूर्ण राशिफळ
Horoscope Today Marathi
Horoscope Today Marathi Saam tv
Published On

आजचे पंचाग

गुरुवार,१९ सप्टेंबर २०२४,भाद्रपद कृष्णपक्ष,

द्वितीया श्राध्द.

तिथी- द्वितीया २४|४०

रास- मीन २९|१५ नं. मेष

नक्षत्र-उत्तराभाद्रपदा ०८|०४

रेवती २९|१५

योग- वृद्धि

करण- तैतिल

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - वायफळ खर्च होईल. आज काही गोष्टींसाठी हात आखडता घेतलेला बरा. चांगल्या वृत्तीने दानधर्मासाठी खर्च कराल. पण मनस्ताप वाट्याला येण्याचा आजचा दिवस आहे.

वृषभ - कलासक्त असणारी आपली रास आहे. एखाद्या ठिकाणी कलेसाठी चार गोष्टी कराल, प्रदर्शनाला भेटी किंवा कलेसाठी नाविन्य आणावे असे वाटेल. जुन्या केलेल्या गोष्टीतून लाभ होईल.

मिथुन- कामासाठी व्यापार व्यवसायासाठी प्रवासाचे योग दिसत आहेत. याच प्रवासातून नवीन ओळखी आणि परिचय प्रस्थापित होतील. याचा आपल्याला फायदा होईल.

कर्क - प्रेमाने सगळ्यांना समजून घ्याल.आपल्याबरोबर इतरांना घेऊन अध्यात्मिक पायवाट धराल. धर्माची धुरा वहायला आवडेल. एक वेगळी सात्विकता आज जपाल.

सिंह- प्रेमामध्ये अपयश विनाकारण कटकटी वाढण्याचा आजचा दिवस आहे. स्तुती प्रिय असणारी आपली रास पण आज अपमान वाट्यास येतील आणि मन खट्टू होईल.

कन्या- खरे काय आणि खोटे काय हे कधीकधी समजतच नाही. आपलेच लोक आपला घात करतात आणि आज द्वीधा मनस्थितीतून आपल्याला बाहेर यावे लागेल. कदाचित जोडीदाराचे सहकार्य मिळेल पण इतर गोष्टीत त्रास दिसतो आहे.

Horoscope Today Marathi
Chanakya Niti: या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत कधीही चुकत नाहीत, वाचा एका क्लिकवर...

तूळ - कलियुग म्हणजे खोट्याची दुनिया ही भावना आज दृढ होईल. आपण कितीही इतरांशी न्यायाने वागलो तरी न्याय कुठेतरी आपल्या बाबतीत कमी पडतो हे आज जाणवेल. विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल.

वृश्चिक - कलाक्षेत्रांमध्ये प्रगतीचे योग आहेत. वाचन, वक्तृत्व इतर काही ऍक्टिव्हिटीज यामध्ये स्वतःला रमवून घ्याल. शेअर्स आणि लॉटरी या दोन्हीमध्ये फायदा संभवतो आहे.

धनु - वाहन सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. आज नवीन काहीतरी घरासाठी खरेदी होईल. एक वेगळेच उत्साहाचे वातावरण घरामध्ये राहील.

मकर- कष्ट आणि मेहनत याच्या जोरावर आज प्रगतीचा पल्ला गाठाल. कधी कधी आपले शांत राहणे भावंडांना बोचते. पण आज त्यांनाही तुम्ही समजून घ्याल. जुना अबोला मिटेल.

Horoscope Today Marathi
Chanakya Niti : सकाळी उठून फक्त 'हे' एक काम करा, आयुष्यात कधीच राहणार नाही रिकामी खिसा

कुंभ - पैसा हा आयुष्यामध्ये महत्त्वाचा आहे. आज काही प्रमाणात आपल्या केलेल्या कामाला यश मिळेल.दिवस उत्तम दिसतो आहे. आज आलेला पैसा वाढेल आणि बरेच दिवस टिकूनही राहील.

मीन - आपली आभा आज तेजमय होईल. काही आनंदी लहरी आजूबाजूला असतील. वैश्विक ऊर्जा, उपासनेमुळे आणि स्वतःच्या मनातील सकारात्मक तरंगामुळे आपल्या भोवती शुध्द विचार रेंगाळतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com