जम्मू-काश्मीर आणि हिमाचल पावसामुळे पंजाबमध्ये पूरस्थिती.
गुरदासपूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय पाण्याखाली गेले.
४०० विद्यार्थी आणि ४० शिक्षक-कर्मचारी शाळेत अडकले.
पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार माजवलाय. या दोन्ही राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील नद्यांना पूर आलाय. त्या पुराचा फटका पंजाब राज्याला बसलाय. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका गुरदासपुर जिल्ह्याला बसलाय. अचानक आलेल्या पुरामुळे येथील जवाहर नवोदय विद्यालय पुराच्या विळख्यात सापडले.
शाळेच्या परिसरात पाणी भरले असून शाळेचे ग्राउंड फ्लोअर पूर्ण पाण्याने भरलाय. हे नवोदय विद्यालय गुरुदासपूरपासून सुमारे १२ किमी अंतरावर असलेल्या डाबुरी गावात आहे. या शाळेत ४०० विद्यार्थी आणि सुमारे ४० कर्मचारी अडकले आहेत. ही शाळा गुरदासूर-दोरांगलाच्या मार्गावर आहे. पुरामुळे या दोन्ही शहरात जाणाऱ्या रस्ता उद्धवस्त झालाय. आजूबाजुच्या परिसरात पुराचे पाणी आलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे येथे बचाव कार्य सुरू करण्यात आले नाहीये.
मुख्यमंत्री भगवंत मान हे संभागला जात आहेत, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे प्रशासन अधिकारी त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी गेले आहेत. दरम्यान उपायुक्त हे शाळेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, तरीही ते बचाव कार्य सुरू करण्यात आले नाहीये. जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारद्वारे निधी प्राप्त सरकारी शाळा आहे. गुरुदासपूरचे उपायुक्त त्याचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. शाळा व्यवस्थापन आणि प्रशानसनाचा हल्लगर्जीपणावर पालक संतपाले आहेत.
पुराचा जोर वाढत असल्याचं दिसत असतानाही शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना आधीच घरी का पाठवलं नाही, असा प्रश्न पालक करत आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती तर तुम्ही सुट्टी का दिली नाही, असा सवाल केला जात आहे. जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना राहण्याची आणि शिक्षणाची सुविधा पुरवली जाते. त्यामुळे या शाळेला सुट्टी देण्यात आली नव्हती. शाळेच्या प्रशासनाने याबाबत माहिती देताना सांगितलं की, शाळेच्या जवळ एक नाला आहे, त्याची सफाई करण्यात आली नव्हती त्यामुळे पाणी शाळेच्या परिसरात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.