फ्लिपकार्टला 1.35 अब्ज डॉलर्सचा दंड? ED चा इशारा Saam Tv
देश विदेश

फ्लिपकार्टला 1.35 अब्ज डॉलर्सचा दंड? ED चा इशारा

वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि त्याच्या संस्थापकांना $ 1.35 अब्ज दंड होऊ शकतो. विदेशी गुंतवणूक कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल ईडीने नोटीस जारी केली आहे.

वृत्तसंस्था

वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि त्याच्या संस्थापकांना $ 1.35 अब्ज दंड होऊ शकतो. विदेशी गुंतवणूक कायद्यांचे कथित उल्लंघन केल्याबद्दल ईडीने नोटीस जारी केली आहे.

तीन सूत्रे आणि तपास यंत्रणा ईडीच्या एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर विदेशी गुंतवणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालय Enforcement Directorate या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

हे देखील पहा-

ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फ्लिपकार्टने विदेशी गुंतवणूक आकर्षित केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर संबंधित पक्ष WS Retail ने त्याच्या शॉपिंग वेबसाइटवर ग्राहकांना वस्तू विकल्या, जे नियमांच्या विरोधात आहे.

एक संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, जुलै महिन्यात ईडीच्या चेन्नई कार्यालयाने फ्लिपकार्ट, त्याचे संस्थापक सचिन बंसल, बिन्नी बन्सल तसेच गुंतवणूकदार टायगर ग्लोबल यांना कारणे दाखवा नोटीस show cause notice जारी केली होती. त्याच्यावर 10,000 कोटी (1.35 अब्ज डॉलर्स) दंड का लावला जाऊ नये, अशी नोटीस विचारण्यात आली.

फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनी भारतीय कायदे आणि नियमांचे पालन करत आहे. प्रवक्ते पुढे म्हणाले की, कंपनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेल. नोटीसनुसार, हे प्रकरण 2009 ते 2015 दरम्यानचे आहे. यापैकी एका सूत्राने सांगितले की, फ्लिपकार्ट आणि इतर पक्षांना नोटीसला उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

टायगर ग्लोबलने या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तर बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी प्रतिक्रिया दिली नाही. यासह, ईडीने अद्याप कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा धसका, CM फडणवीसांनी सांगितला निवडणूक प्लान | VIDEO

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व मुंडे कुटुंबियांची परळीत रोहित पवार घेणार भेट

SCROLL FOR NEXT