दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये सोमवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधील एका निर्माणाधीन मंदिराची भिंत कोसळून मलब्याखाली ५ मजूर अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. मलब्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. (Latest marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन स्थित जगन्नाथ मंदिराच्या तळमजल्याचं काम सुरु होतं. त्या तळमजल्यासाठी अनेक मजूर कम करत होते. त्याचवेळी एका बाजूची भिंत कोसळून काही मजूरांच्या अंगावर कोसळली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या घटनेत मजूर चंद्रपाल (२६) याचा मृत्यू झाला आहे. या मलब्यात अडकेल्या मजुरांची वाचविण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचं पथक काम करत आहे.
गुरुग्राममध्ये भगवान जगन्नाथ यांचं मंदिर तयार करण्याचं काम सुरु होतं. गुरुग्राममधील सेक्टर -१५ मध्ये हे काम सुरु होतं. मंदिराच्या तळमजल्यासाठी काम करत असताना एक भिंत त्यांच्यावर कोसळली. त्यानंतर त्यांच्यावर माती पडली. या घटनेत हे मजूर भिंतीच्या मलब्याखाली अडकले. तर या घटनेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेतील ४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
काही मिडिया रिपोर्टनुसार, गुरुग्राम येथील मंदिराचं काम करताना मंदिराची भिंत मजुरांवर कोसळली. त्या भिंतीखाली मजूर अडकले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या मंदिराच्या कंत्रादराने पाच जणांना काम नेमून दिलं होतं. या मंदिराच्या भिंतीच्या मलब्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका २६ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.