Telangana Accident: नियतीचा क्रूर खेळ! अपघातस्थळी मुलाला पाहायला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ ठार

Accident News: दाट धुक्यामुळे वाहनांचा अंदाज न आल्याने या दोन्ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Telangana Accident News
Telangana Accident NewsSaam tv
Published On

Telangana Road Accident News:

तेलंगणामधून (Telangana) दोन भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. या अपघातात एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे वाहनांचा अंदाज न आल्याने या दोन्ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, निदामनूर मंडलातील वेंपहाड रविवारी (२४ डिसेंबर) रात्री पहिला अपघात झाला. २८ वर्षीय केशवुलु (28) हा मिरयालागुडा मोटारसायकलवरून पेड्डापूरकडे जात होता. यावेळी त्याने त्याने सैदुलू (55) या पादचाऱ्याला धडक दिली. या दुर्घटनेत दोघांनाही आपला जीव गमवावा लागला.

या अपघाताची माहिती मिळताच केशवुलू याच्या कुटुंबातील सात सदस्य सोमवारी पहाटे टाटा अपघातस्थळी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्या गाडीचा आणि तेलाच्या टँकरचा रिवारमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातातील इतर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Telangana Accident News
Lok Sabha Survey: राज्यात मोदींचीच हवा; कोणताही सर्व्हे असो, आम्ही लोकसभेच्या 40 जागा जिकणार: देवेंद्र फडणवीस

रामावत गनैया (४०), पांडिया (४०), बुज्जी (३८) आणि नागराजू (२८) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर अपघातात जखमी झालेल्या तिघांना मिर्यालागुडा एरिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या अपघातात मृत्यू झालेले पाचजण हे मल्लेवानी कुंता थांडा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

Telangana Accident News
Sakinaka Fire: मुंबईतील साकीनाका परिसरात कारखान्याला आग, अग्निशमन दलाचे ८ वाहने घटनास्थळी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com