Raipur family of five found dead Saam TV
देश विदेश

Crime News: रात्री कुटुंबानं काय केलं? पती-पत्नीसह ३ मुलांचा संशयास्पद मृत्यू; कारण वाचून थरकाप उडेल

Family Death Case : बंद घरातून एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात पतीने पत्नी व तीन मुलांना विष देऊन त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Raipur family of five found dead : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील टिकरापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय नगर भागातील एका बंद घरामध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, कुटुंब प्रमुख साजिद अली याने आधी आपल्या पत्नीला आणि तीन मुलांना विष देऊन मारले आणि त्यानंतर स्वतः फाशी लावून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

हा संपूर्ण प्रकार कर्जाच्या प्रचंड तणावातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. त्याशिवाय आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली जात आहे.

बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासानुसार, कर्जाच्या तणावामुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगरमधील घरात राहणाऱ्या ५० वर्षीय शेख साजिद अलीने पत्नी राबिया आणि तीन मुले - इरशाद अली, शाहिदा बेगम आणि इरसाबा परवीन - यांना विष देऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतला.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, साजिद अली कर्जामुळे खूप त्रस्त होता आणि लोकांकडून सतत पैशांची मागणी करून त्याचा छळ केला जात होता. यामुळेच त्याला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडले. एफएसएलचे पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण उघड होईल.

स्थानिक रिपोर्ट्नुसार, दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी त्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. घर आतून पूर्णपणे बंद होते आणि काहीतरी अनुचित घडल्याच्या भीतीने रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खूप प्रयत्न करूनही त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांच्या एका पथकाने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा अपघात

Green Saree Blouse Design: आषाढी एकादशीला हिरव्या साडीवर ट्राय करा 5 फॅशनेबल ब्लाऊज

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! भररस्त्यात तरुणाचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Varanasi Movie : डोळ्यात आग अन् चेहऱ्यावर मिश्किल हास्य; 'वाराणसी' चित्रपटातील प्रियांका चोप्राचा नवा लूक समोर | PHOTO

White Shoes Cleaning : सफेद शूज पुन्हा दिसतील नव्यासारखे! फॉलो करा 'हे' सोपे उपाय

SCROLL FOR NEXT