देश विदेश

एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या, घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह; प्रत्येकाच्या डोक्यात झाडल्या गोळ्या

Uttar pradesh Crime : एकाच कुटुंबातील ५ जणांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. घरात रक्ताच्या थारोळ्यात सर्वांचे मृतदेह आढळले.

Vishal Gangurde

सहारनपूरमध्ये घडली खळबळजनक घटना

एकाच कुटुंबातील ५ जणांच्या हत्या

हत्याकांडाने संपूर्ण गावात भीतीचं वातावरण

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या गावातून खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका अशोक नावाच्या व्यक्तीच्या घरात ५ जणांचे मृतदेह आढळले. पाचही जण एकाच कुटुंबाचे सदस्य होते. या पाचही जणांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी नातेवाईकांना गोळ्या झाडून व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. पंरतु पोलीस हे हत्या आणि आत्महत्या या दोन्ही बाजूने तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या मृतांमध्ये एक पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मीन अशोक (४०),पत्नी अंजिता (३७), आई विद्यावती (७०), दोन मुले कार्तिक(१६)-देव (१३) अशी मृतांची ओळख समोर आली आहे. अशोक आणि त्यांची पत्नी अंजिताचं मृतदेह फरशीवर आढळला. विद्यावती आणि दोन्ही मुलांचे मृतदेह बेडवर आढळले. पाचही जणांचे मृतदेह एकाच खोलीत आढळले. अशोक यांनी आई-बायको आणि मुलांना गोळ्या झाडून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक हे कर्जबाजारी झाले होते. या कर्जावरून त्यांच्या घरात वाद व्हायचे. या मानसिक तणावातून अशोक यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर कुटुंबाबाहेर व्यक्तीने येऊन पाच जणांची हत्या केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस दोन्ही बाजूने तपास करत आहेत. पोलीस आता शेजारी आणि नातेवाईकांची चौकशी करणार आहे.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक हे तहसील कार्यालयात नोकरीला होते. वडिलांच्या निधनानंतर अशोक यांना नोकरी मिळाली होती. अशोक यांचा मुलगा खासगी शाळेत इयत्ता ९ वीमध्ये शिक्षण घेत होता. तर दुसरा मुलगा कार्तिक हा इयत्ता १० वीमध्ये होता. कुटुंब अगदी शांत होतं. त्यांच्या घरात कधीच वाद झाल्याचे ऐकलं नव्हतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणती बुलेट देते सगळ्यात जास्त मायलेज? जाणून घ्या Royal Enfield Bullet 350 ची सविस्तर माहिती

Malpua Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मालपुआ, नोट करा रेसिपी

Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Toyota EV: टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक Urban Cruiser Ebella लाँच; 543 KM रेंज, 7 एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी बरंच काही, वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Live News Update: अकोल्यात भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर'

SCROLL FOR NEXT