महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार? ठाकरे साधणार नेम, शिंदेंचा होणार गेम?

Mumbai Mayor Post : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाची चर्चा रंगलीय...महापौरपदासाठी भाजप कशा पद्धतीने शिंदेसेनेचा गेम करण्याची शक्यता आहे... महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये पडद्यामागे काय हालचाली सुरु आहेत...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Mumbai politics
mumbai politics Saam tv
Published On

राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजपनं सर्वाधिक 1400 जागा जिंकल्या... मात्र त्यानंतरही राज्यात चर्चा रंगलीय ती आणखी एका राजकीय भूकंपाची.... कारण महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत हॉटेल पॉलिटिक्सला जोर आलाय.शिंदेंचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यातच शिंदेनी अडीच वर्षांचं महापौरपदाची मागणी केल्याची चर्चा आहे आणि हीच गोष्ट भाजपला खटकली...आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरेंशीच चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीला ब्रेक लावण्यासाठी भाजप, ठाकरेंमध्ये समेटाची चर्चा

महापौरपद, स्थायी समितीच नव्हे तर बेस्ट समिती अध्यक्षपद देण्यास शिंदेसेनेचा भाजपला नकार

शिंदेसेनेला शह देण्यासाठी ठाकरेसेनेसोबत छुप्या युतीची चर्चा

महापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरेसेनेचे 65 नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता

निवडणुकीदरम्यान गैरहजर राहून 2017 मधील परतफेडीची चर्चा

Mumbai politics
धाड धाड...! मुंबई हादरली, भररस्त्यात तरुणांकडून गोळीबार; नागरिक दहशतीत

या चर्चेनंतर भाजप आणि ठाकरेसेनेची चांगलीच धावाधाव झालीय.. राजकारणात काहीही अशक्य नसल्याचं सांगत भाजपनं सूचक संकेत दिलेत... तर ठाकरेंशी पडद्यामागे चर्चा सुरु असल्याचं वृत्त ठाकरेसेनेनं फेटाळून लावलंय.. दुसरीकडे फडणवीसांचं महत्व कमी करण्यासाठी दिल्लीतून चावी दिली जात असल्याचा टोलाच खासदार संजय राऊतांनी लगावलाय...

Mumbai politics
आई महापालिकेत सफाई कामगार; आता त्याच पालिकेत मुलगा नगरसेवक म्हणून बसणार

मुंबईत एवढं मोठ्या प्रमाणावर हॉटेल पॉलिटिक्स सुरु असल्यानं आता भाजपही सावध झालीय..22 जानेवारीला महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे... त्यामुळे भाजपनं सर्व नगरसेवकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नयेत, असा सूचना दिल्या आहेत... त्यामुळे आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर शिंदेसेना एक पाऊल मागे घेणार की भाजप ठाकरेंशी छुपी युती करुन प्रभाकर पै यांच्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबईचं महापौरपद पटकावणार.... यावर राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com