Vande Bharat Express Fire Saam TV
देश विदेश

Vande Bharat Express Fire: धावत्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला अचानक आग; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Vande Bharat Train Fire Video: भोपाळहून दिल्लीला निघालेल्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बीना शहराजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Satish Daud

Vande Bharat Train Fire Video: भोपाळहून दिल्लीला निघालेल्या वंदे भारत ट्रेनच्या एका डब्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. बीना शहराजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या आग लागल्याचं कळताच लोको पायलटने तातडीने ट्रेन थांबवली. ट्रेनमधून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

बॅटरीमुळे स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Train) क्रमांक 20171 भोपाळ - हजरत निजामुद्दीन वंदे भारत १७ जुलै रोजी सकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निघाली.

ट्रेन बीना-ललितपूर दरम्यान कुरवई स्थानकादरम्यान आली असता, ट्रेनमधील सी-१४ या कोचला अचानक आग लागली. या डब्यामधून ३० प्रवासी प्रवास करीत होते. आग लागल्याचे कळताच लोको पायलटने गाडी थांबवली. ट्रेनमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, आगीची माहिती अग्निशमन दलाला (Fire Brigad) देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागली तेव्हा मध्य प्रदेशचे आयएएस अविनाश लवानिया आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय सिंह हेही वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये उपस्थित होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

मुंबईत १४ लाख बोगस मतदार? आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप|VIDEO

क्रीडा विश्वाला मोठा धक्का; माजी दिग्गज क्रिकेटपटूने घेतला जगाचा निरोप

SCROLL FOR NEXT