FIR Against Bharat Jodo Nyay Yatra  Saam TV
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra : 'भारत जोडो न्याय यात्रा' आणि आयोजकांविरोधात FIR दाखल, काय आहे कारण?

FIR Against Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेने जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले, एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Bharat Jodo Nyay Yatra :

'भारत जोडो न्याय यात्रा' आणि त्याचे मुख्य आयोजक केबी बायजू यांच्याविरुद्ध FIR दाखल झाला आहे. गुरुवारी आसाममधील जोरहाट शहरामध्ये परवानगी दिलेल्या मार्गात बदल केल्याने हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परवानगीनुसार केबी रोडकडे जाण्याऐवजी मोर्चाने शहरात वेगळे वळण घेतले आणि यामुळे परिसरात गोंधळाी स्थिती निर्माण झाली. लोकांच्या अचानक गर्दीमुळे काही लोक पडले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

यामुळे यात्रा आणि मुख्य आयोजकांविरुद्ध जोरहाट सदर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भारत जोडो न्याय यात्रेने जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले, एफआयआरमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं की, भारत जोडो न्याय यात्रा शहरातून जाऊ नये, असं आम्ही आधीच सांगितलं आहे. जो काही पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याला परवानगी दिली जाईल. मात्र शहरातून जाण्याचा आग्रह असेल तर आम्ही पोलिस बंदोबस्त करणार नाही.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधींनी सोशल मीडिया X वर लिहिलं की, आसाममध्ये पोहोचल्यानंतर मला मणिपूर आणि नागालँडच्या लोकांकडून जितके प्रेम मिळाले तितकेच प्रेम इथे मिळाले. तुमच्या वेदना, तुमच्या समस्या आणि तुमच्यावर होत असलेला भयंकर अन्याय समजून घेणे हा आमच्या भेटीचा उद्देश आहे.

आसाम सरकार हे भाजपच्या रूपाने द्वेषाच्या खतातून जन्माला आलेले भ्रष्टाचाराचे पीक आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे काम केवळ द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणे आहे.

पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला कधीही पराभूत करू शकत नाही. आपल्याला या अन्यायाविरुद्ध लढायचे आहे आणि असा आसाम निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक हाताला रोजगार मिळेल आणि ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव सदैव समृद्ध राहील, असं राहुल गांधींनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT