Sakshi Sunil Jadhav
किडनी खराब झाल्यावर शरीराच्या आतल्या त्वचेत काही बदल दिसतात. पण बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
जेव्हा त्वचा नेहमीपेक्षा जास्त कोरडी आणि खरखरीत होऊ शकते. तेव्हा तुमच्या किडनीमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे कळते.
शरीराला वारंवार खाज येत असेल तर किडनीच्या आजाराशी संबंधित असू शकतं. काही लोकांमध्ये ही खाज जास्त वाढते.
सतत खाजवल्यामुळे त्वचेवर लालसरपणा, ओरखडे, जखमा किंवा जाडसर चट्टे दिसू शकतात.
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यावर शरीरातले काही अपायकारक घटक बाहेर टाकण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे त्वचेचा रंग फिकट दिसू शकतो.
किडनी शरीरातली जास्तीचे द्रव बाहेर टाकण्यात अडचण आल्यावर शरीरात पाणी साचू शकतं. त्यामुळे पाय सूज दिसू शकते.
काही किडनीच्या आजारांमध्ये त्वचेवर पुरळ, लालसर चट्टे किंवा छोटे उठाव दिसू शकतात. त्यासोबत खाजही येऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.