Sakshi Sunil Jadhav
मुलांनी कोणाशी मैत्री करावी, हे पालकांनी ठरवण्यापेक्षा चांगला आणि वाईट मित्र ओळखण्याची समज मुलांना द्यावी. प्रामाणिकपणा, चांगली वागणूक आणि मदत करण्याची वृत्ती यांना महत्त्व द्यायला शिकवा.
फक्त चांगले मार्क्स किंवा मोठी नोकरी मिळवणे म्हणजे यश नाही. मुलांमध्ये प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि दयाळूपणा यांसारखे गुण विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियावर काय शेअर करायचं आणि काय नाही, हे मुलांना समजावून सांगा. घराचा पत्ता, वैयक्तिक माहिती किंवा खासगी फोटो कोणासोबत शेअर करू नयेत, याची जाणीव करून द्या.
रागाच्या भरात किंवा उत्साहात लगेच बोलण्याची सवय मुलांना लागू शकते. काही बोलण्याआधी ते खरं आहे का, कोणाला दुखावेल का आणि ते बोलणं गरजेचं आहे का, याचा विचार करायला शिकवा.
प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही. मुलांना अपयशातून शिकण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची सवय लावा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक मजबूत होतो.
मुलांना नेहमी मार्क्स किंवा स्पर्धेतील यशावरूनच जज करू नका. त्यांनी केलेल्या मेहनतीचं कौतुक करा. यामुळे त्यांच्यात सातत्याने प्रयत्न करण्याची सवय निर्माण होते.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. अभ्यास असो किंवा एखादा छंद, मुलांना नियमितपणे प्रयत्न करण्याची सवय लावावी.
मुलांना राग, भीती, दुःख किंवा निराशा वाटत असेल तर त्यांना लगेच गप्प करू नका. त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करण्यास शिकवा.