Court News Saam Digital
देश विदेश

Court News: धक्कादायक! लैंगिक छळाच्या त्रासामुळे महिला न्यायाधीशांनी मागीतलं इच्छामरण, नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Court News: उत्तर प्रदेशमधील एका महिला न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे.

Sandeep Gawade

Court News

उत्तर प्रदेशमधील एका महिला न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून सीजेआय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस अतुल एम. कुर्हेकर यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून स्टेटस रिपोर्ट मागून घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा न्यायाधीशांनी आपल्याला रात्री बोलावल्याचा दावा या महिला न्यायाधीशांनी पत्रात केला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे यासंदर्भात तक्रार करूनी मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच पत्राच्या शेवटी इच्छामरणाची मागणी केली आहे. संविधानाच्या कलम २१ अन्वये माणसाला जसा जगण्याचा अधिकार आहे. तसा सन्मानाने मरण्याचाही अधिकारही आहे, असं म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायाधीशांचं हे पत्र सध्या व्हायरल होत आहे. या महिला न्यायाधीशांची बांदा जिल्ह्यात बदली आहे. दरम्यानच्या काळात जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या नातेवाईकांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. तसेच जिल्हा न्यायाधीश रात्री भेटण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होते, असा आरोप महिला न्यायाधीशांनी या पत्रात केला आहे. यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. मात्र त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्यामुळे आपण हे पत्र सीजेआय यांना लिहित असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp News : सलग दुसऱ्या दिवशी Whatsapp गंडलं, स्क्रोलिंग झालं बंद, युजर्स हैराण

मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

Beetroot Paratha : मुलांना नकळत हेल्दी फूड खायला घालायचंय? मग बीटापासून बनलेला हा पिंक पराठा नक्की ट्राय करा

पुण्यात क्रीडा संकुलमध्ये डोपिंग सदृश इंजेक्शन आढळले; क्रीडा विश्वात खळबळ|VIDEO

Bajaj Pulsar 150 दहा हजारांनी स्वस्त होणार, नवीन किंमत किती?

SCROLL FOR NEXT