feast for people in samalkha panipat to welcome olympic gold medallist neeraj chopra ANI
देश विदेश

विजयाेत्सव! तीस हजार पाहुण्यांची मेजवानीसह विशेष व्यवस्था

Siddharth Latkar

सातारा : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राच्या याच्या निवासस्थानी त्याने मिळविलेल्या यशाचा, विजयाचा उत्सव साजरा केला जात आहे. सुमारे तीस हजार पाहूणे पानिपात येथील समलाखा या त्याच्या गावातील घरी मिष्टान जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचले आहेत. काेण समोसावर तर काेण जिलेबी, लाडूवर ताव मारीत आहेत. या मेजवानीत सर्व प्रकारच्या मिठाईंचा समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. feast for people in samalkha panipat to welcome olympic gold medallist neeraj chopra दरम्यान आपल्या लाडक्या लेकासाठी आईने चूरमा churma (हरियाणा भागातील प्रसिद्ध पदार्थ) केल्याचे सांगितले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात देशास सुवर्णपदक जिंकून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आणि आजही अनेक संस्था त्याचा सत्कार करीत आहेत. नीरज चोप्रा याने आपले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित केले आहे. अभिनव बिंद्रा नंतर ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजा चोप्राने 'यावर विश्वास बसत नाही असे नमूद केले हाेते. भारताने अॅथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज नीरजच्या घरी त्याचे अभिनंदन करण्यासाठी सकाळपासून हजाराे लोक येऊ लागले आहेत. नीरजची आई सरोज देवी या खूप खूष आहेत. त्या आनंदाने सर्वांची विचारपूस करीत आहेत. मुलाच्या स्वागतासाठी मी चुरमा तयार केला आहे असे त्यांनी नमूद केले.

सराेज देवी यांनी नीरजचे सुवर्णपदक मंदिरात ठेवणार असल्याचे सांगितले. त्याच्या विजयाचा आनंद गावात साजरा केला जात आहे. यासाठी आम्ही वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान हजाराे लाेक नीरजच्या निवासस्थाना नजीक उभारलेल्या मंडपात स्वादिष्ट पदार्थांचा आनंद लुटत आहेत. काेण समोसावर, जिलेबीवर तर काेण लाडूवर ताव मारत आहे. नीरज त्याच्या मूळ गावी पानिपतमध्ये समालखा गाठला आहे. या दरम्यान त्याचे तेथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याला सर्वत्र मिळत असलेल्या अपार प्रेमामुळे नीरज खूप आनंदी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT