Uttar Pradesh Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: ...आज मी शांतपणे झोपेन, बलात्कार प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर, मृतदेह घेण्यास वडिलांचा नकार

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या आरोपीचा मृतदेह स्वीकारण्यासा त्याच्या वडिलांनी नकार दिला. यावेळी त्यांनी योगी सरकारचे आभार मानले.

Priya More

उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुलीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या आरोपीवर पोलिसांनी २५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस त्याचा शोध घेत होते अखेर त्यांनी आरोपीचा शोध घेतला. पण अटक करत असताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. शहजाद उर्फ निक्की (३४ वर्षे) असं आरोपीचे नाव होते. या आरोपींच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आणि आज मी शांतपणे झोपेल अशी प्रतिक्रिया दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहजादविरोधात ७ गु्न्हे दाखल होते. नुकताच एका बलात्कार पीडितेच्या घरी गोळीबार करून तो पळून गेला होता. सोमवारी सकाळी सरूरपूर पोलिस ठाण्यानजीकच्या जंगलाजवळ पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी घेराव घातला. त्यावेळी आरोपीने पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी संरक्षणार्थ गोळीबार करत आरोपीचा एन्काऊंटर केला.

पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गेलेल्या कारवाईमध्ये निक्कीच्या छातीला गोळी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. शहजादवर ७ वर्षांच्या मुलीसह दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतरही तो सुधारला नाही आणि काही दिवसांपूर्वीच त्याने एका बलात्कार पीडितीच्या घरी जाऊन गोळीबार केला होता.

एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्या शहजादचे वडील रईसुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाला पोलिसांनी शवागारात बोलावले होते. तेव्हा त्यांनी मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, 'मी मृतदेह घेणार नाही. संपूर्ण आयुष्य त्याने त्रास देण्यात घालवले. आज मी शांतपणे झोपेन.' त्यांनी हे देखील सांगितले की, 'शहजादने नवव्या वर्षापासून गुन्हेगारीला सुरू केली होती आणि त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न आम्ही केले पण त्याने झुगारले होते. त्यांनी स्वतः त्याला दोनदा पोलिसांच्या स्वाधीन केले होते परंतु तो सुधारला नाही.'

शहजादच्या वडिलांनी पुढे सांगितले की, 'मी आज आनंदी आहे. माझ्या मुलाला मारल्याबद्दल मी योगी सरकार आणि पोलिसांचा आभारी आहे. आरोपीचे लग्न झाले होते. त्याने लग्नाच्या फक्त तीन महिन्यांनंतर त्याच्या पत्नीला सोडले होते आणि तो तरुण मुलींना त्रास देत होता. एवढा क्रूर माणूस ठीक आहे का? तो मेला तर बरे होईल. मी खूप आनंदी आहे. मी आज माझे पाय पसरून झोपेन.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

Maharashtra Politics: अजित पवारांनी मोठा डाव टाकला; एकाच दिवशी भाजप आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

Mumbai Travel : 2025 ला निरोप अन् नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत, मुंबईकरांनो न्यू इयरला 'या' ठिकाणी नक्की जा

SCROLL FOR NEXT