Rajasthan Crime news Saam TV News
देश विदेश

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

Father-in-law Accused of Molesting Daughter-in-law: सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग व छळ प्रकरण समोर आलं. पीडित सूनेनं पोलीस ठाण्यात धाव घेत एफआयआर दाखल केला.

Bhagyashree Kamble

  • राजस्थानातील रामगंज मंडीत सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग व छळ प्रकरण समोर आलं.

  • पीडित सूनेनं पोलीस ठाण्यात धाव घेत एफआयआर दाखल केला.

  • आरोपीला अटक करण्यात पोलिसांनी विलंब केल्याने कुटुंबाने एसडीएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

  • आंदोलनाच्या दबावामुळे पोलिसांनी अखेर आरोपी सासऱ्याला अटक करून पुढील तपास सुरू केला.

राजस्थानातील रामगंज मंडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासऱ्यानं सूनेचा विनयभंग करत मानसिक छळ केला आहे. सून आंघोळ करताना सासरा तिच्यावर नजर ठेवायचा. सासऱ्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेनं थेट पोलीस ठाणे गाठले . तसेच सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सूनेनं दाखल केलेल्या तक्ररीनुसार, सून जेव्हा बाथरूमला जायची तेव्हा सासरे तिच्या मागून यायचे आणि सूनेला मिठी मारायचे. घटनेच्या दिवशी सासऱ्यानं सूनेला बेडवर ढकलले. नंतर जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूनेनं विरोध केला. सासऱ्याला अडवलं. तसेच तिनं थेट तिच्या पतीला फोन करून आपबिती सांगितली.

पतीला माहिती दिल्यानंतर तिनं पोलीस ठाणे गाठले. तसेच सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला. मात्र, गुन्हा दाखल करूनही आरोपीवर पोलिसांकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. घटनेनंतर पीडिता माहेरी गेली. माहेरीहून तिनं न्यायाची मागणी केली.

पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कुटुंबाने आरोपीच्या अटकेची मागणी करणारे निवेदन एसडीएमना सादर केले होते. आरोपीच्या अटकेला झालेल्या विलंबामुळे संतप्त झालेल्या पीडितेने आणि तिच्या कुटुंबाने मंगळवारी एसडीएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तसेच पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT