डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेवरून राजकीय वातावरण तापलं
राकेश टिकैत यांनी जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला योग्य म्हटलं
लोकसंख्या वाढत असल्याने खासदार आणि आमदारांची संख्याही वाढायला हवी.
देशभरात डिलिमिटेशनवरून राजकीय रणकंदन माजलंय. एनडीएचं सरकार संसदेत उद्या म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी डिलिमिटेशनचं विधेयक मांडणार आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक असल्याचं बहुमत आहे. त्याचदरम्यान भाजप आणि एनडीएमधील पक्षांसाठी एक मोठी बातमी आहे. भाजपच्या कट्टर विरोधक असलेल्या नेत्यानं सरकारच्या आमदार आणि खासदारांच्या संख्या वाढीच्या निर्णयाला योग्य असं म्हटलंय. त्यामुळे हा केंद्राचा विजय झाला असल्याचं म्हटलं जातंय.
भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलंय की, जर केंद्र सरकारने लोकसंख्येच्या प्रमाणात खासदार (MPs) आणि आमदारांची (MLAs) संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मांडला, तर हे एक योग्य पाऊल आहे. लोकसंख्या वाढत असल्याने जागांची संख्याही वाढायला हवी. लोकप्रतिनिधींची संख्या वाढल्यामुळे विकासकामांना गती मिळेल. जनतेला आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील.
लवार येथील मिथेपूर रोडवर असलेल्या एम.एम. हॉस्पिटलमध्ये शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राकेश टिकैत सांगितले की, त्यांच्या संघटनेत विविध राजकीय विचारसरणींचे लोक सामील आहेत. प्रत्येकाला आपापले विचार बाळगण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे स्वातंत्र्य आहे. ही संघटना कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नाही.
भारतीय किसान युनियन (बीकेयू) शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देते. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करते. समाजवादी पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत टिप्पणी करताना टिकैत म्हणाले की, त्यात शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि त्यांची आर्थिक स्थिती यांचा योग्य विचार करून धोरणे आखली पाहिजेत. साखरेसह विविध वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असताना, उसाचा दर मात्र जैसे थेच आहे.
शेतीचा खर्च वाढत चालल्यामुळे उसाच्या दरातही वाढ करणे आवश्यक आहे. रुग्णालयाचे संचालन करणारे डॉ. इक्बाल मलिक यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जुनैद, डॉ. कैफ आणि डॉ. खुशनासीब हे देखील उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.