fake whatsapp account created of lok sabha speaker om birla
fake whatsapp account created of lok sabha speaker om birla Saam Tv
देश विदेश

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप खाते; खासदारांना पाठवले संदेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप खाते बनवून खासदारांना संदेश पाठवण्याचा प्रकार समोर आला आहे. ओम बिर्ला (om Birla) यांच्या कार्यालयाने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या प्रकरणाची माहिती बिर्ला यांच्या कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर ओडिशा पोलिसांकडून (odisha police) तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ट्विट करत सदर प्रकरणाची माहिती दिली आहे. (fake whatsapp account created of lok sabha speaker om birla )

हे देखील पाहा -

ओम बिर्ला म्हणाले की, माझ्या फोटोचा वापर करून बनावट व्हाट्सअॅप खाते तयार करण्यात आले आहेत. या बनावट व्हाट्सअॅप खात्यावर माझा फोटो वापरण्यात आला आहे . तसेच या खात्यातून खासदारांना संदेश पाठवण्यात आले आहेत. ७८६२०९२००८, ९४८०९१८१८३, ९४३९०७३८७० या क्रमांकावरून संदेश पाठवले जात आहेत, अशी माहिती बिर्ला यांनी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच ओम बिर्ला यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली. बनावट खात्याच्या क्रमांकावरून संदेश मिळताच त्याच्याकडे दुर्लक्ष्य करावे, अशी माहिती देखील ओम बिर्ला यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

ओडिसा पोलिसांनी केली तिघांना अटक

लोकसभा ओम बिर्ला यांच्या बनावट व्हाट्सअॅप खात्याची (fake whatsapp account) माहिती मिळताच ओडिसा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींचे संबंध सायबर गुन्हेगारांशी (Cyber Criminal) शंका व्यक्त केली जात आहे. या आरोपींनी काही सिमकार्ड एका टोळीला विकले होते. त्यातील एका सिमकार्डचा वापर बिर्ला यांचे बनावट व्हाट्सअॅफ खाते बनवण्यासाठी केला होता.

उपराष्ट्रपतींच्या नावाने तयार केले होते बनावट खाते

गेल्या महिन्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (vyanka naidu) यांच्या नावाने देखील बनावट खाते तयार केले होते. या खात्यावरून व्हीआयपीसहित अन्य लोकांना संदेश पाठवून मदत मागितले होते. त्यावेळी उपराष्ट्रपती कार्यालयाने गृह विभागाला याबाबत माहिती दिली होती.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT