बेळगाव: कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी २५०० करोड रुपये मागितल्याचा खळबळजनक दावा भाजपचे (BJP) आमदार बासनगौडा पाटील यतनाल यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर कॉंग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजपला अजून कोणता पुरावा हवा आहे? असं म्हणत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (karnataka bjp mla basanagouda yatnal claim of cm post for 2500 cr congress dk shivakumar attack bjp)
हे देखील पाहा -
एएनआयच्या वृत्तानुसार, कर्नाटक (Karnataka) काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, बसनागौडा पाटील यतनाल यांच्याकडे सर्वकाही उपलब्ध असताना, त्यांना (भाजपला) आणखी कोणते पुरावे हवे आहेत? आम्ही कोणाचा राजीनामा मागत नाही. पण २५०० कोटींच्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर कोणी दिली हे भाजपने विचारावे. यतनाल हे माजी मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू नये, असे शिवकुमार यांनी यापूर्वी म्हटले होते. याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करावा. काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. हा राष्ट्रीय प्रश्न आहे. यावर देशात चर्चा व्हायला हवी.
भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यतनाल यांनी गुरुवारी पक्षाच्या एका कार्यक्रमात नेत्यांना राजकारणात एक गोष्ट समजून घ्या, असा इशारा दिला होता. राजकारणात असे अनेक चोर तुम्हाला सापडतील, जे तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुम्हाला तिकीट मिळवून देण्याचं, दिल्लीला घेऊन जाण्याचं, सोनिया गांधींशी तुमची ओळख करून देण्यासाठी बोलणी करण्याचं आश्वासन देईल असा टोला लगावला. तसेच अशा लोकांनी हे सर्व माझ्यासारख्या लोकांवर केले आहे. दिल्लीहून काही लोक माझ्याकडे आले. ते मला मुख्यमंत्री करतील, असा दावा करत होते, मला फक्त २५०० कोटींची व्यवस्था करायची आहे.
विजयपुराचे आमदार यतनाल यांनी बेळगावमध्ये सांगितले की, मी आडवाणी, राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासोबत वाजपेयी सरकारमध्ये काम केलेली व्यक्ती आहे. ज्यांनी ही ऑफर दिली त्यांना मी विचारले होते की, तुम्हालाही माहित आहे की २५०० कोटी किती आहेत. एवढे पैसे कोण स्वतः कडे ठेवेल का? असे अनेक लोक फिरत राहतात, त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना वेग आला असताना हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.