बनावट फर्जीवाडा; मोबाईलच्या नावावर विकले जात होते साबण
बनावट फर्जीवाडा; मोबाईलच्या नावावर विकले जात होते साबण Saam Tv
देश विदेश

बनावट फर्जीवाडा; मोबाईलच्या नावावर विकले जात होते साबण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी एक टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी बनावट कॉल सेंटरद्वारे लोकांना कमी पैशात मोबाईलचे आमिष दाखवून लोकांकडून ऑर्डर घेऊन त्यांना साबण पाठवत होती. पोलिसांनी या टोळीतील 53 जणांना अटक केली आहे.

उपपोलीस आयुक्त प्रणव तायल यांनी सांगितल्यानुसार, दोन आरोपी बेकायदेशीर कॉल सेंटर चालवायचे, तेथून ते टपाल विभागाचे अधिकारी म्हणून लोकांना फोन करायचे. या कॉल सेंटरचा प्रमुख टपाल खात्याचा कर्मचारी होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांमध्ये या रॅकेटने लोकांना आपले बळी बनवले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी लोकांना आमिष दाखवत असे की, अल्पकाळासाठी लोकांना 18000 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन फक्त 4500 रुपयांमध्ये मिळतील अशी आमच्याकडून ऑफर जारी करण्यात आली आहे. भारत पोस्ट द्वारे लोकांपर्यंत मोबाईल आणि इतर गोष्टी पोहोचवण्यासाठी वापरले जाते. यासोबतच ही टोळी लोकांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्यायही देत ​​असे जेणेकरून त्यांना कुठेही संशय येऊ नये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Detox Drinks: कडकत्या उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवेल 'ही' स्पेशल ड्रिंक

Devendra Fadnavis Meet Ganesh Naik : ठाण्यातलं नाराजीनाट्य फडणवीसांच्या भेटीने संपणार? गणेश नाईक-फडणवीस भेट होणार

PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

SCROLL FOR NEXT