औरंगाबादः औरंगाबाद शहरातील किराडपुरा भागात Aurangabad उघड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर स्त्री जातीचे अर्भक Infant रविवारी आढळून आले होते. परिसरातील मुले खेळत Playing असताना त्यांना हे बाळ दिसले होते. त्यांनी तत्काळ ही माहिती मोठ्या व्यक्तींना दिली आहे. नागरिकांनी पोलिसांना सांगून या नवजात बाळाला घाटी रुग्णालयात Ghati Hospital Aurangabad दाखल केले. मात्र सोमवारी रात्री उपचार सुरु असताना या बाळाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाळाला कचऱ्यात फेकणाऱ्या अज्ञात मातेचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी सिडको N 6 भागात एका अर्भकाला उघड्यावर सोडून दिल्याची घटना ताजी आहे असे असतानाच रविवारी हा प्रकार घडल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे देखील पहा-
किराडपुरा भागात राहणारे अय्युब खान युसूफ खान हे रविवारी काम आटोपून घरी परतत होते. तेव्हा रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांना परिसरात गोंधळ ऐकू आला. घराच्या बाहेर येऊन पाहिले असता तिथे काही महिला व लहान मुले जमलेली दिसली. तेव्हा मुलांना विचारले असता, तेथे खेळणाऱ्या काही लहान मुलांना पाण्याच्या बंबाजच्या मोकळ्या मैदानात एका कचराकुंडीजवळ बाळ असल्याचे दिसले होते.
अय्युब यांनी आणखी मित्रांना घेऊन तिकडे गेले, आणि या नवजात मुलीला येथे सोडून दिल्याचे त्यान्ना आढळून आले. काही महिलांनी त्या बाळाला नवजात मुलीला कपड्यात गुंडाळले आणि त्यांनी बाळाला पोलिसांच्या मदतीने घाटीत दाखल केले.
Edited by-Sanika Gade
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.