Fake Cancer Drug Racket: Bengaluru, Maharashtra And Tamil Nadu Link Under Probe saam tv
देश विदेश

कॅन्सरच्या नकली औषधांची विक्री; बेंगळुरूसह महाराष्ट्र, तमिळनाडूतही नेटवर्क

Fake Cancer Drugs : बेंगळुरूमध्ये बनावट कॅन्सर औषधे, जीवनरक्षक औषधे आणि ICU इंजेक्शनच्या संशयित रॅकेटचा तपास सुरू आहे. 90 हून अधिक रुग्णालये आणि क्लिनिक्सपर्यंत औषध पोहोचली आहेत.

Suprim Maskar

  • बेंगळुरूमध्ये बनावट कॅन्सर औषधे आणि ICU औषधांच्या संशयित रॅकेटचा तपास सुरू

  • 90 हून अधिक रुग्णालये आणि क्लिनिक्सपर्यंत संशयित औषधांचा पुरवठा

  • SIT औषधांचा पुरवठा, बनावट लेबल, आर्थिक व्यवहार आणि कथित बहुराज्यीय नेटवर्कचा तपास करत आहे.

देशभरात बोगस औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराची बोगस औषधं विकून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू होता. हा बोगस औषध विक्रीचा घोटाळा कुठे उघडकीस आलाय? कोण-कोणत्या राज्यांत या औषधांची विक्री सुरू होती? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

ज्या औषधांवर विश्वास ठेवून माणूस मरणाच्या दारातून परत येण्याची वाट पाहतो. त्याच जीवनाचा आधार असणाऱ्या औषधांद्वारे थेट 50 टक्के सवलतीत मृत्यू विकला जातो. होय कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर आणि आयसीयूमध्ये लागणाऱ्या जीवनरक्षक औषधांच्या नावाखाली बनावट औषधांचा काळाबाजार समोर आलाय.

बंगळुरूमधल्या तब्बल ९० हून अधिक रुग्णालये, क्लिनिक्स आणि मेडिकल स्टोअर्समध्ये या बनावट औषधांची डिलिव्हरी झाली असून, लाखो निष्पाप रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला गेलाय. तब्बल ५० टक्क्यांच्या भरघोस डिस्काउंटचे आमिष दाखवून बनावट औषध विकण्याची ही मोडस ऑपरेंडी कशी होती पाहा.

रुग्णालयांना आणि मेडिकल स्टोअर्सना ५० टक्के डिस्काउंट देऊन बनावट औषधे पुरवण्यात आली. कालबाह्य झालेल्या औषधांवर नवीन कंटेनर आणि नामांकित कंपन्यांचे बनावट लेबल लावून लोकांना गंडवण्यात आलं. पोलिसांनी बिदादी आणि दोड्डेरी येथील फार्महाऊसवर छापा मारून ५ कोटींचा साठा जप्त केला या रॅकेटचं महाराष्ट्र, तमिळनाडू आणि हरियाणात नेटवर्क असुन १५ एजंट्सद्वारे या नकली औषधांचे वितरण करण्यात आलं. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या या रॅकेटचा मुख्य सूत्रधार प्रशांत अजूनही पोलिसांना चकवा देतोय.

हा नुसता औषधांचा घोटाळा नाही, तर हा रुग्णांच्या जीवाशी मांडलेला खेळ आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने आधीच खचलेल्या रुग्णांना औषधांच्या नावाखाली विषारी केमिकल पाजणाऱ्या या नराधमांवर कडक कारवाईची मागणी आता वकीलांनीही उचलून धरलीये.

पैशांच्या हाव्यासापोटी निष्पाप रुग्णांची फसवणूक करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे. मात्र रुग्णांनीही डिस्काऊंटच्या मोहाला बळी न पडता औषधांची शाहनिशा करणं गरजेचं आहे. कारण बंगळुरूमध्ये घडलेलं हे कांड उद्या तुमच्या-आमच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

SCROLL FOR NEXT