Caste Validity : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत सर्वात मोठी बातमी, ऑफलाईन अर्ज बाद, वाचा नवीन नियम

Maharashtra caste validity certificate new rules : जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयानुसार जात वैधता प्रमाणपत्रासाठी आता १०० टक्के ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
Saam TV Breaking News
Saam TV Breaking NewsSaam TV Breaking News
Published On: 

Caste validity certificate online apply Maharashtra : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी (Caste Validity) धडपडणाऱ्या अर्जदारांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. यापूर्वी अंशतः ऑनलाईन असलेली जात पडताळणी प्रक्रिया आता राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने १०० टक्के ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार, यापुढे पडताळणीसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल आणि सर्व कागदपत्रेही ऑनलाईनच जोडावी लागतील. त्यामुळे ऑफलाईन अर्ज यापुढे स्वीकारले जाणार नाहीत किंवा ग्राह्य धरले जाणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.