Cockroach Janata Party Saam Tv
देश विदेश

Cockroach Janata Party: 'कॉक्रोच'वर दंगलीचा आरोप? व्हीआयपींच्या गाडीवर दगडफेक? काय आहे व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य?

Cockroach Janata Party viral video: ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नावाने दगडफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते व्हीआयपींच्या गाडीवर दगडफेक करत अस्लयाचे दिसत आहे.

Priya More
  • ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नावाने दगडफेकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय

  • व्हिडिओमध्ये व्हीआयपी वाहनांवर हल्ला केल्याचा दावा

  • पडताळणीत हा व्हिडिओ मार्च 2026 मधील जुन्या घटनेचा असल्याचे उघड

  • कॉक्रोच जनता पार्टीचा या दगडफेकीशी कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न

कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत काही तरुण व्हिआयपींच्या गाडीवर दगडफेक करत असल्याचं दिसतंय. पण, खरंच कॉक्रोच जनता पार्टी रस्त्यावर उतरलीय का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

सोशल मीडियावर एक 18 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामध्ये, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर एक जमाव दगडफेक करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत एक मेसेजही व्हायरल होतोय. कॉक्रोच आता रस्त्यावर उतरली आहेत. आता व्हीआयपी कोणी नाही, सर्वजण समान आहेत.असा मेसेज करण्यात आलाय. पण, खरंच कॉक्रोच जनता पार्टीने व्हिआयपींच्या गाडीवर दगडफेक केलीय का?

हा व्हिडिओ कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने व्हायरल होतोय आणि आता कुणीही व्हीआयपी नाही, सगळेच समान असतील असा दावा करण्यात आलाय. यावेळी काही तरुण दोन गाड्यांवर दगडफेक करताना दिसतायत. मोठा जमाव असून, गाड्या वेगानं चालल्यायत. आणि हाच 18 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करून कॉक्रोच जनता पार्टीने ही दगडफेक केल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच कॉक्रोच जनता पार्टी आता रस्त्यावर उतरलीय का? आक्रमक होऊन व्हीआयपींच्या गाडीवर दगडफेक केलीय का?

या व्हिडिओची पडताळणी आमच्या व्हायरल सत्य टीमने सुरू केली. हा व्हिडिओ कधीचा आहे? कोणत्या भागातील आहे? याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. कॉक्रोच जनता पार्टीचा दगडफेकीच्या व्हिडिओशी संबंध नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ मार्च 2026 मधील घटनेचा आहे. फरसाबाबाच्या मृत्यूनंतर गोरक्षकांनी पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला होता. कॉक्रोच जनता पार्टी 16 मेनंतर चर्चेत आली.

सध्या असे व्हिडिओ व्हायरल करून तरुणांची दिशाभूल केली जातेय. कारण, देशात सध्या कॉक्रोच जनता पार्टीची क्रेज आहे आणि कॉक्रोच जनता पार्टीचे कोट्यवधी सभासद आहेत. त्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल करून तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे असे व्हिडिओ पाहून यावर विश्वास ठेवू नका. आमच्या पडताळणीत 'कॉक्रोच जनता पार्टीवर दंगलीचा आरोप असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टेन्शन वाढलं! तुमच्या LICचे 350 कोटी बुडणार? देशात 15 लाख कोटींचा महाघोटाळा?

Pune News: पुण्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, आई- वडील अन् मुलाचा दुर्दैवी मृत्यू

कोकणात ठाकरेसेना नामशेष? कोकणात ठाकरेसेनेला गळती सुरूच

कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, जेन-झींच्या आंदोलनाला परवानगी मिळणार?

एटीएममध्ये कॅशचा खडखडाट? नागरिकांवर नवीन आर्थिक संकट?

SCROLL FOR NEXT