Benjamin Netanyahu Death Rumours 
देश विदेश

इराणच्या हल्ल्यात इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंचा मृत्यू? त्या व्हिडिओनंतर जगभरात खळबळ; नेमकं काय आहे सत्य?

Iran Israel conflict : इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. मात्र इस्रायल सरकारने या सर्व बातम्या फेटाळून लावत नेतन्याहू सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

Namdeo Kumbhar

Benjamin Netanyahu Death Rumours : इराणच्या शक्तिशाली हल्ल्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मृत्यू झाला, या अफवेने सध्या जगभर खळबळ माजली आहे. मागील काही दिवसांपासून नेतन्याहू यांच्या निधनाची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. इराणच्या हल्ल्यात त्यांचा जीव गेल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या बातमीमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. इस्रायलने सोशल मीडियावरील सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. नेमकं त्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय आहे? कशामुळे नेमकी चर्चा सुरू झाली? इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने या अफवांवर काय म्हटलंय? पाहूयात...

एक्स वरील एका व्हिडिओनंतर काही युजर्सकडून नेतन्याहू यांच्या सहाव्या बोटाचा दावा केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ एआयचा असल्याचे म्हणत नेतन्याहू यांच्या निधनाच्या चर्चा सुरू झाल्या. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची हत्या झाल्याच्या सोशल मीडियावरील अफवांचे इस्त्राइलकडून खंडन (Israel Denies Viral Claims After Iran Attack) करण्यात आले आहे. नेतन्याहू सुरक्षित असल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्याशिवाय एआय चॅटबॉट असणाऱ्या ग्रोक कडूनही हे ऑप्टिकल भ्रम असल्याचे म्हटले आहे.

अफवा का आणि कधी सुरू झाल्या ?

इराण आणि इस्त्राइल यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षाबद्दल नेतन्याहू यांनी पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अफवा सुरू झाल्या. कारण, भाषणादरम्यान नेतान्याहू यांच्या उजव्या हातावर सहा बोटे असल्याचे एका युजर्सच्या लक्षात आले. ३५ सेकंदाचा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. हा व्हिडिओ एआयचा असल्याचे बोलले जात आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढता तणावामुळे अनेकांनी या बातमीवर विश्वास ठेवला आणि एकाच चर्चा सुरू झाली.

पाहा व्हायरल होणारा व्हिडिओ

इस्रायल सरकारचे स्पष्टीकरण

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरली. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने (PMO) तातडीने यावर स्पष्टीकरण देण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाकडून बेंजामिन नेतन्याहू यांच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावण्यात आले. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांच्या हत्येच्या अफवांमध्ये कसलंही तथ्य नसल्याचे इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं.

बेंजामिन नेतन्याहू यांचा खरंच मृत्यू झाला? नेमकं सत्य काय?

व्हायरल होणारा व्हिडिओ हा एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचे स्पष्ट झाले. इराण-इस्त्राइल युद्धामध्ये लोकांमध्ये संभ्रम तयार करण्यासाठी फेक व्हिडिओ तयार केल्याचं स्फष्ट झाले आहे. बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाकडूनही हे वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT