पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झाल्याचा दावा करण्यात आलाय. अफगाणी मीडियाने हा दावा केल्याने एकच खळबळ उडालीय...इम्रान खान हे पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाचे संस्थापक असून रावळपिंडीतील जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत...गेल्या कित्येक दिवसांपासून इम्रान खान यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही...आताही इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनादेखील त्यांची भेट घेऊ दिली जात नसल्याने त्यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलाय...
इंडिया टीव्हीने दावा केलाय की इम्रान खान किल इन जेल... आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलंय. तर फर्स्ट पोस्टने लिहिलंय इम्रान खान कुठे आहेत...त्यांच्या मृत्यूबद्दल बातम्या का व्हायरल होतायत...? तर पाकिस्तानच्या डॉन पेपरनेही इम्रान खान यांच्याबाबत बातमी छापलीय...त्यामध्ये म्हटलंय की इम्रान खान यांच्या पक्षाने सरकारकडे त्यांच्या तब्येतीबाबत माहिती देण्याची मागणी केलीय...
पण खरंच पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची हत्या झालीय का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला...
इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांनी केलेले मागील आरोपही तणाव वाढवण्यासाठी जबाबदार आहेत...जेलमधून सुटल्यानंतर बुशरा बीबींनी जेलमध्ये इम्रान खान यांना विष देण्याची योजना आखण्यात आली होती...लष्करप्रमुख असीम मुनीर त्यांना संपण्याचा कट आखतायत असा आरोप केला होता...या विधानांमुळे आधीच संशय निर्माण झाल्याने इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा करण्यात आलाय.
यामुळे अदियाला जेल बाहेर इम्रान समर्थकांनी गर्दी केलीय...मात्र, आम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
व्हायरल सत्य काय?
साम इन्व्हिस्टिगेशन
इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झालेली नाही
इम्रान खान यांच्या हत्येची अफवा असल्याची माहिती
हत्येच्या अफवांमुळे पाकिस्तानी राजकारण अस्थिर
अफगानी मीडियाकडून इम्रान यांच्या हत्येचा दावा
इम्रान खान हे जेलमध्ये सुखरुप असल्याची माहिती जेल प्रशासनाने दिलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत इम्रान खान यांची हत्या झाल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.