Fact Check साम टीव्ही मराठी
देश विदेश

Fact Check : इलेक्ट्रिक स्कूटीचा स्फोट, चालकाच्या चिंधड्या? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Electric Scooter, EV Battery, Viral Video : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचा आणि चालक हवेत उडाल्याचा व्हायरल व्हिडिओ खरा आहे का? साम टीव्हीच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ एआयने तयार केलेला बनावट असल्याचे समोर आले.

Namdeo Kumbhar

व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत...आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता ईव्ही स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय...या व्हिडिओत स्फोट झाल्यानंतर चालक हवेत उडाल्याचं दिसतंय...पण, खरंच ईव्ही स्कूटरचा एवढा मोठा स्फोट झालाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

या व्हिडिओमध्ये ईव्ही स्कूटरचा स्फोट होताना दिसतंय...आणि चालक हवेत उडतोय...यात चालक गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आलाय...ईव्ही स्कूटर धोकादायक असून, बॅटरीचा कधीही स्फोट होतो असा दावा केल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झालीय...व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे ईव्ही स्कूटर घेण्याबाबतही अनेकांमध्ये संभ्रम आहे...पण, खरंच ईव्ही स्कूटरचा असा स्फोट झालाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...कारण, अनेक जण ईव्ही गाड्या वापरतात...आणि सुरक्षेसाठी याबद्दल सत्यता सांगणं गरजेचं आहे...आमच्या टीमने हा व्हिडिओ कुठला आहे...? याचा शोध घेतला...तसेच या व्हिडिओची प्रत्येक फ्रेम न फ्रेम तपासणी केली...यावेळी या व्हिडिओत काहीतरी गडबड दिसली...ज्यावेळी या गाडीचा स्फोट होतो त्यावेळी व्यक्ती हवेत उडतो...आणि हवेत उडल्यानंतर ती व्यक्ती हवेतच गायब होते...आणि खाली फक्त स्कूटरची सीट पडते...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

साम इन्व्हिस्टिगेशन

ईव्ही स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झालेला नाही

इलेस्ट्रिक स्कूटरच्या स्फोटाचा व्हिडिओ खोटा

बाईकवरून हवेत उडणाऱ्याचा व्हिडिओ AI निर्मित

खोटा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल

असे व्हिडिओ व्हायरल करून लोकांमध्ये भीती निर्माण केली जातेय...काही ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यायत हे खरं आहे...पण, इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याचा व्हिडिओ आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...व्हिडिओ एआय निर्मित असून, कुणालाही यावर शंका येणार नाही असा बनवण्यात आलाय...त्यामुळे अशा व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधून दरे गावाकडे रवाना

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

SCROLL FOR NEXT