महाराष्ट्रात आकाशातून महाकाय गारांचा पाऊस पडलाय का? हा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे...एवढ्या मोठ्या गारा अंगावर पडल्या तर माणसाचा जीवच जाईल...पण, खरंच एवढ्या मोठ्या गारा महाराष्ट्रात पडल्यायत का...? हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, या व्हिडिओमागचं सत्य जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला...
...या व्हिडिओमध्ये बर्फाचे मोठे मोठे गोळे रस्त्यावर पडताना दिसताय...एवढ्या मोठ्या गारा पडल्याने उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झालंय...दुकानावर मोठ्या गारा पडल्या...तर तारांवरही गारा पडत असल्याने त्या हालत असल्याचं दिसतंय...व्हिडिओत दिसत असलेली गाडी पुणे पासिंगची दिसतेय...त्यामुळे काहींना हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा केलाय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...एवढ्या मोठ्या गारा कधी पडल्याचं ऐकलं नव्हतं...त्यामुळे खरंच एवढ्या मोठ्या गारा आकाशातून पडू शकतात का...? याची आम्ही माहिती मिळवण्यासाठी पडताळणी सुरू केली...याबाबत आम्ही तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...तसेच हा व्हिडिओ नीट पडताळून पाहिला...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
गारांचा व्हायरल व्हिडिओ AI निर्मित
राज्यात कुठेही अशा महाकाय गारा पडलेल्या नाहीत
दुकानांच्या पाटीवरील शब्द वेगळ्या भाषेत दिसतायत
गाडीच्या मागे असलेली रिक्षाही महाराष्ट्रातील नाही
एवढ्या मोठ्या गारा कुठेही पडलेल्या नाहीत...व्हिडिओ हा एआय निर्मित आहे...व्हिडिओ नीट पाहिला तर तो बनावट असल्याचं स्पष्ट दिसतं...पण, काहीजण असे व्हिडिओ शेअर करून दिशाभूल करतात...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी महाराष्ट्रात 5 किलोच्या गारांचा पाऊस पडल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.