Eye Flu Disease Increased Saam Tv
देश विदेश

Eye Flu Disease Increased: 'आय फ्लू'ने वाढवलं टेन्शन! भारतात वेगाने पसरतोय, 'ही' लक्षणं दिसल्यास जा डॉक्टरांकडे

Eye Flu Symptoms: देशामध्ये आय फ्लूने (Eye Flu) सर्वांचे टेन्शन वाढवले आहे. देशात आय फ्लू वेगाने पसरत आहे.

Priya More

Eye Flu Disease: पावसाळा (Rainfall) सुरु झाला की अनेक आजार पसरायला सुरुवात होते. सध्या देशामध्ये पावसाळ्यामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) अनेक राज्यात पूरसदृश्य (India Flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक आजारांनी डोकं वर काढले आहे. सध्या देशामध्ये आय फ्लूने (Eye Flu) सर्वांचे टेन्शन वाढवले आहे. देशात आय फ्लू वेगाने पसरत आहे.

आय फ्लू हा डोळ्यांचा आजार आहे. या आजारामुळे डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यामध्ये वेदना होणे आणि डोळे लालसर होणे यासारखी लक्षणं दिसतात. आय फ्लू या आजाराचे प्रमुख कारण म्हणजे एलर्जी आहे. बऱ्याचदा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील आय फ्लू होऊ शकतो. एका डोळ्याला संसर्ग झाला तर आपल्या दुसऱ्या डोळ्यावर देखील त्याचा परिणाम होतो. आय फ्लू एकाला झाला तर त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या इतरांना होतो. त्यामुळे सध्या देशामध्ये आय फ्लूच्या रुग्णांची मोठी वाढ झाली आहे.

उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्णतेनंतर आता पावसाळ्यामध्ये वातावरणात झपाट्याने बदल होत असतात. या ऋतुमध्ये हवेसोबत प्रदुषण आणि आद्रतेमुळे फंगल इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. यामुळे सर्वात जास्त डोळ्यांशीसंबंधीत अनेक समस्या निर्माण होतात. या ऋतुमध्ये फंगल इन्फेक्शन वाढल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं खूपच गरजेचे आहे.

डोळ्याशी संबंधीत असलेल्या या आजारामुळे डोळे गुलाबी आणि लाल होतात. डोळ्यामध्ये सतत पाणी येते. डोळ्यांमध्ये जळजळ, खाज येणे, पिवळसर द्राव येणे यासारख्या समस्या होतात. कधी कधी डोळ्यांना सूज देखील येते. डोळ्यातून पाणी येण्यासोबतच खाज देखील येते. हे इन्फेक्शन जास्त वाढू नये यासाठी डोळे स्वच्छ ठेवून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

आय फ्लूला डोळे येणे असे देखील म्हटले जाते. डोळे येणे म्हणजेच कंजंक्टीव्हायटिसपासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यात आपल्या डोळ्यांची योग्यपद्धतीने काळजी घेणं खूपच गरजेचे आहे. जर तुम्हाला देखील ही लक्षणं दिसत असतील तर तुम्ही वेळ न घालवता तात्काळ डॉक्टरांकडे जावे. कारण घरामध्ये जर एखाद्याला आय फ्लू झाला तर इतरांना देखील त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच काळजी घेणं फारच गरजेचे आहे.

'आय फ्लू'ची लक्षणं -

- डोळे लालसर होणे

- डोळ्यांना सूज येणे

- डोळ्यांना खाज येणे

- डोळ्यात जळजळ होणे

- प्रकाशाची संवेदनशीलता

- डोळ्यातून पांढरा चिकट स्त्राव येणे

- डोळ्यातून सतत पाणी येणे

'आय फ्लू'पासून असा करा बचाव -

- हाताची चांगली स्वच्छता ठेवा आणि हात वारंवार धुवा.

- डोळ्यांना संसर्ग हा सर्वात जास्त घाणेरड्या हातांमुळे पसरते.

- डोळ्यांचा मेकअप करणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांशी शेअर करणे टाळा.

- तुमचा टॉवेल दुसऱ्यांना वापरायला देऊ नका.

- डोळ्यांसाठी वापरली जाणारी कॉस्मेटिक प्रोडक्ट्स कालबाह्य झाल्यानंतर वापरू नका.

- आपले उशांचे कव्हर वारंवार बदला.

- आपले टॉवेल वारंवार धुवा आणि स्वच्छ कपडे घाला.

- आय फ्लू झालेल्या लोकांच्या संपर्कात येऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

Airtel Prepaid: Airtel कडून यूजर्सना सरप्राईज ऑफर! एअरटेल प्रीपेड ग्राहकांना Apple Music मोफत उपलब्ध

Rain Update: मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी, हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT