Kanchanjunga Express Accident Saam Tv
देश विदेश

Kanchanjunga Express Accident : रेल्वे अपघात कधी थांबणार? गेल्या ६२ वर्षात हजारो दुर्घटना अन् प्रवाशांचा मृत्यू, वाचा सविस्तर

explainer about kanchanjunga express accident update : भारतात गेल्या ६२ वर्षांत ३८ हजारांहून अधिक वेळा रेल्वे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या रेल्वे अपघातात हजारो प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सोमवारी रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना घडली. मालगाडीने कंचनजंगा एक्स्प्रेसने धडक दिली. या रेल्वे अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ५० प्रवासी जखमी झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, पश्चिम बंगालमध्ये सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रेल्वे अपघाताची भीषण दुर्घटना घडली. कंचनजंगा एक्स्प्रेस अगरतलाहून सियादाह येथे निघाली होती. त्याचवेळी मालगाडीने कंचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांनी सांगितले की, मालगाडीचा लोको पायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केलं. या भीषण अपघातात लोको पायलट आणि ट्रेनचा गार्डचाही मृत्यू झाला.

या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. मागील वर्षी जून महिन्यात ओडिशाच्या बालासोरमध्ये मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी कोरोमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली होती.

२००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कालावधीत १७१ रेल्वे अपघात झाले आहेत. तर २०१४ ते २०२३ सालापर्यंत सरासरी ७१ रेल्वे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आकडेवारीनुसार, मागील काही दशकात रेल्वे अपघात कमी झाले आहेत. १९६०- ६१ ते १९७०-७१ या १० वर्षांच्या सालामध्ये १४,७६९ रेल्वे अपघात झाले आहेत. तर २००४-०५ ते २०१४-१५ या सालादरम्यान १८४४ अपघात झाले आहेत.

२०१५-१६ ते २०२१-२२ या सहा वर्षांच्या काळात ४४९ रेल्वे अपघात झाले आहेत. यानुसार १९६० ते २०२२ या एकूण ६२ वर्षांच्या काळात ३८,६७२ रेल्वे अपघात झाले आहेत. यानुसार, प्रत्येक वर्षाला सरासरी ६०० हून अधिक अपघात झाले आहेत.

रेल्वे अपघातात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांच्या काळात ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३९० लोक जखमी झाले आहेत. आकडेवारीनुसार, २०१९-२० आणि २०२०-२१ या काळात रेल्वे अपघातात एकही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही. या काळात कोरोना महामारीमुळे रेल्वे काही महिने बंद केल्या होत्या.

२०२१-२२ सालात ३४ रेल्वे अपघात झाले होते. यातील २० अपघात रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे झाले होते. तर चार अपघात हे इक्विपमेंट फेल झाल्यामुळे झाले होते. रेल्वे अपघातानंतर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांना रेल्वेकडून आर्थिक मदतही जाहीर केली होती. पाच वर्षांत रेल्वेने १४ कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर २०२१-२२ मध्ये रेल्वेने ८५ लाख रुपयांहून अधिक रुपये आर्थिक मदत जाहीर केले होते.

रेल्वे अपघातानंतर मृतकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली. तर गंभीर जखमींना २.५ लाख रुपये देण्यात आले. तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT