PM Modi: 'कंचनजंगा एक्स्प्रेस' अपघातात प्रवाशांसह ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू; PM मोदींनी केलं दु:ख व्यक्त, हेल्पलाईन क्रमांक जारी

PM Modi X Post On West Bengal Train Accident: 'कंचनजंगा एक्स्प्रेस' अपघातावर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघानंतर सियालदह स्थानकावर हेल्पलाईन बुथ तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी
PM Modi X Post On West Bengal Train AccidentSaam Tv
Published On

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

पश्चिम बंगालमध्ये आज १७ जून रोजी सकाळी 'कंचनजंगा एक्स्प्रेस'चा भीषण अपघात झाला आहे. आतापर्यंत या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय. यात प्रवाशांसह तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातामध्ये ५० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातावर पंतप्रधान मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, अमित शाह आणि प्रियंका गांधी यांनी X पोस्ट करत दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातातील मृतकांची संख्या वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पीएम मोदींची सोशल मीडिया पोस्ट

पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वे अपघात दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल दु:ख आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला (PM Modi On West Bengal Train Accident) आहे. बाधितांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अपघाताच्या ठिकाणी जात असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी त्यांच्या X अकाउंटवर दिली आहे.

या अपघातानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी त्यांच्या X अकाउंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एनएफआर झोनमध्ये दुर्दैवी अपघात झाला आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ समन्वयाने काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी येथे झालेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी अपघातात ज्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया अमित शहा (Amit Shah) यांनी दिली आहे. त्यांनी X पोस्ट करत या अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान मोदी
West Bengal Train Accident: पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात; कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकली; अनेकांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झालेल्या रेल्वे अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी दुःखद आहे. ईश्वर मृतकांच्या आत्म्यांना शांती देवो. शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा. भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवास हा आता चिंतेचा विषय बनला आहे. मी (Priyanka Gandhi) काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत आणि बचाव कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करते, अशी पोस्ट कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली आहे.

हेल्पलाईन क्रमांक

या अपघातानंतर सियालदह स्थानकावर एक विशेष हेल्पलाइन बूथ तयार करण्यात आला आहे. ०३३२३५०८७९४, ०३३-२३८३३३२६ हे हेल्पलाइन क्रमांक आहेत. या घटनेबाबत माहिती किंवा मदत आवश्यक असणारे प्रवासी या क्रमांकावर संपर्क साधू (Kanchanjunga Express Accident) शकतात. प्रवाशांना अधिक मदत करण्यासाठी नैहाटी स्थानकावर अतिरिक्त हेल्प डेस्कही उभारण्यात येत आहे. नैहाटीमधील हेल्पलाइन क्रमांक, रेल्वे क्रमांक ३९२२२. बीएसएनएल क्रमांक ०३३-२५८१२१२८ असा आहे.

पंतप्रधान मोदी
West Bengal Train Accident Video: पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! 'कंचनजंगा एक्स्प्रेस'ला मालगाडीची धडक; अपघातस्थळाचा थरकाप उडवणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com