Corona Virus in India, Maharashtra Saam Tv
देश विदेश

covid 19 jn1 variant Explainer : कोरोना आणि नव्या व्हेरिएंटची एन्ट्री केरळ, महाराष्ट्रातूनच का? काय आहे कारण...

covid 19 jn1 variant in India : महाराष्ट्र आणि केरळमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. राज्याची लोकसंख्या आणि कोरोना नियमांचे पालन न करणे हे देखील यामागचे कारण सांगितलं जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये ही समस्या दिसून आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Why Does Corona Virus Come In Maharashtra:

कोरोना व्हायरस देशात पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. देशात 24 तासांत कोरोनाचे एकूण 412 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1ने प्रशासनाचं टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये सध्या सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. मात्र कोरोनाच्या मागील तीन वर्षांच्या पॅटर्नवर नजर टाकली तर प्रत्येकवेळी महाराष्ट्र आणि केरळ वाटेने कोरोना देशात प्रवेश करतो आणि पसरतो. मात्र असं का होतं असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याबाबत माहिती घेऊया. (Latest News)

कोरोनाची सुरुवात केरळमधूनच का?

केरळमधील लोक मोठ्या संख्येने परदेशात स्थायिक झाले आहेत किंवा नोकरी, व्यवसाय आणि प्रवासासाठी बाहेर जातात. अशा परिस्थितीतदेशात परतणार्‍यांची त्यांची संख्याही जास्त आहे. केरळ हे भारतातील अनेक राज्यांपेक्षा लहान आहे, परंतु कन्नूर, कोची, कोझिकोड आणि त्रिवेंद्रमसह एकूण 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहेत, जे व्हायरसच्या एन्ट्रीचे कारण बनत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईत रुग्ण आढळण्याचं कारण काय?

महाराष्ट्रातील मुंबई हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. परदेशातून येणार नागरिकांची संख्या देखील येथे मोठी आहे. यासोबत इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाचे सुरुवातीचे रुग्ण (Patient) येथे आढल्याचे मागील तीन वर्षात दिसून आले आहे. राज्याची लोकसंख्या (Population) आणि कोरोना (Corona) नियमांचे पालन न करणे हे देखील यामागचे कारण सांगितलं जात आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये ही समस्या दिसून आली.

परदेशातून लोक भारतात परत येतात त्यावेळी त्यातील काहीजण नवीन विषाणू किंवा रोग घेऊन येतात. परदेशात राहणारा माणूस जेव्हा मायदेशी परततो तेव्हा तो त्या देशात पसरलेला नवीन विषाणूसोबत घेऊन येतो. त्यानंतर त्याचा प्रसार भारतात होता. त्यामुळे केरळ आणि महाराष्ट्र नव्या व्हायरसचे उगमस्थान ठरत आहेत. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात काही दिवसांपूर्वी नव्या JN.1 व्हेरिएंटचे 5 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर इतर ठिकाणी देखील नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहे.

कोरोनाची देशातील सद्यस्थिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात मागील 24 तासात 412 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मृत्यू कर्नाटकात झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे 4170 सक्रिय रुग्ण आहेत. देशात मागील 24 तासांत भारतात कोविड-19, JN.1 च्या नवीन व्हेरिएंटचे एकूण 116 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT