Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचं अपहरण करायची; SIT चा उच्च न्यायालयात खुलासा
Karnataka High Court On Prajwal Reveanna: Telegraph
देश विदेश

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचं अपहरण करायची; SIT चा उच्च न्यायालयात खुलासा

Bharat Jadhav

प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केलाय. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील ७ पीडितांचं अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान लैंगिक शोषणाचे हे प्रकरण लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आले होते, हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत कर्नाटकातील सर्व जागांवर मतदान झाले होते.

दरम्यान उच्च न्यायालयात भवानी रेवन्ना ह्यांनी १४ जून रोजी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी वेळी विशेष पथकाने ५५ वर्षीय भवानी ह्याच लैंगिक अत्याचार पीडितेच्या अपहरणाचा मास्टरमाईंड आणि किंगपिन होत्या असं सांगितलं.

सध्या कर्नाटक हायकोर्टाने अटकपूर्व जामीन याचिकेवरील आपला निर्णय राखून ठेवलाय. परंतु ७ जून रोजी अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण एक आठवड्यासाठी वाढविलंय. तसेच भवानी यांना एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्यास सांगितलंय. दरम्यान भवानी रेवन्ना ह्या ७ पीडितांना आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी झाल्या असल्याचं तपासात समोर आल्याचं न्यायालयाने सुनावणी करताना सांगितलंय.

SPP रविवर्मा कुमार यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी दाखल केलेल्या आक्षेपांच्या विधानाचा हवाला देत न्यायालयाने म्हटलं की, “याचिकाकर्त्याने लैंगिक छळाच्या पीडितांना विविध मार्गांनी शांत करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना याच्या छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये असलेल्या काही पीडित महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live : आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा

Badam Halwa : बदाम हलवा सिंपल आणि स्विट रेसिपी

Ind vs SA T20 WC Match Live Updates : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकणारा संघ विजेता होईल की होणार नवा इतिहास?

VIDEO: राज्यात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू, Eknath Shinde यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT